'मला तुला किस करायचंय', नोरा फतेहीची सोशल मीडियावरील पोस्ट तुफान होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:18 PM2021-07-28T12:18:43+5:302021-07-28T12:19:07+5:30

नोरा फतेहीची सोशल मीडियावरील पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसते आहे.

'I want to kiss you', Nora Fatehi's post on social media is going viral | 'मला तुला किस करायचंय', नोरा फतेहीची सोशल मीडियावरील पोस्ट तुफान होतेय व्हायरल

'मला तुला किस करायचंय', नोरा फतेहीची सोशल मीडियावरील पोस्ट तुफान होतेय व्हायरल

Next

अभिनेत्री नोरा फतेहीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिने आपल्या डान्स आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र तिची सोशल मीडियावरील एक पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. 

नोरा फतेहीने मला तुला किस करायचे आहे असे कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 
अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत नोराने या फोटोखाली दिलेले कॅप्शन खूपच चर्चेत आले आहे. नोराने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला तुला किस करायचे आहे पण कदाचित मी तुला मिस करते बेब. तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.  नोरा फतेहीला नक्की कुणाला किस करायचं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


नोरा फतेहीने आपल्या डान्स कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अनेक म्युझिक व्हिडीओत नोरा दिसली आहे. तर अनेक सिनेमातील तिचे डान्स नंबर्स चांगलेच गाजले आहेत. त्यासोबतच डान्स रिएलिटी शोमध्ये ती जज म्हणूनही झळकली आहे. 


नोराने बॉलिवूडमध्ये २०१४ साली पदार्पण केले होते. हिंदी चित्रपटासोबतच साऊथच्या अनेक सिनेमात ती आयटम नंबर करताना दिसली. तिला खरी ओळख मिळाली ती जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर गाण्यामुळे. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात डान्स करताना दिसली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'I want to kiss you', Nora Fatehi's post on social media is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app