कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रेटींनी स्वत:ला सेल्फ क्वारांटाईन केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या क्वारांटाईन आहे. इन्स्टाग्रामवरुन ते फॅन्सच्या संपर्कात असते.


दीपिकाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव येते. काही महिन्यांपूर्वी इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान दीपिका म्हणाली की, मी आजही सिनेमा 10 वर्षांपूर्वीच्या नियमाप्रमाणे निवडते. मी सिनेमा निवडताना माझ्या मनाचे ऐकते. मी तेच सिनेमे करते जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात. सिनेमाची कथा ऐकून मी जर एक्सायडेट झाली तरच सिनेमा साईन करते. 


 दीपिका तिच्या ‘महानती’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती अशी चर्चा रंगली होती.निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे.

Web Title: I choose those movies which challenges to me said deepika padukone gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.