Huma Qureshi blasts website for saying Sohail Khan and Seema ignored her | ‘त्या’ बातमीने भलतीच खवळली हुमा कुरेशी; एकदा वाचा तरी!!
‘त्या’ बातमीने भलतीच खवळली हुमा कुरेशी; एकदा वाचा तरी!!

ठळक मुद्दे २०१६ मध्ये हुमा व सोहेल यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. अर्थात हुमाने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी दीर्घकाळापासून गायब आहे. पण लवकरच हुमाची ‘लीला’ ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे आणि याचदरम्यान हुमा अचानक चर्चेत आलीय. कारण काय तर तिच्याबद्दलची एक बातमी. होय, एका एंटरटेनमेंट न्यूज पोर्टलने हुमाबद्दलची बातमी दिली आणि ही बातमी वाचून हुमा जाम भडकली. आपला संताप तिने सोशल मीडियाद्वारे बोलून दाखवला.
‘तुम्हाला (संबंधित एंटरटेनमेंट न्यूज पोर्टल) आम्हा सर्वांची माफी मागायला हवी. तुमच्याकडे नैतिकता नावाची कुठलीही गोष्ट नाही. म्हणूनच अ‍ॅक्टर्स तुमच्या बिनडोकपणाकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग स्वीकारतात. तुम्हाला वाटते की, आम्ही तुम्हाला घाबरतो. अजिबात नाही,’ अशा शब्दांत हुमाने आपला संताप बोलून दाखवला. ती इथेच थांबली नाही तर ती आणखी बिथरली. 

‘ तुम्ही माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली. तुम्हाला लाज वाटायला हवी. माझ्याबद्दल काहीच ठाऊक नसताना मीडिया असे काही लिहितो. मीडिया असे का करतो, हेही मला ठाऊक आहे. याचे कारण म्हणजे, मीडियाच्या लेखी माझ्या मेहनतीला काहीही अर्थ नाही. मी एका विशिष्ट व्यक्तीमुळे सगळे काही मिळवलेय, असे मीडिया भासवू इच्छिते. हे अपमानास्पद आहे, ’ असे बरेच काही ती बोलून गेली.
हुमा इतकी का बिथरली, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर संबंधित न्यूज पोर्टलने सोहेल खानला हुमाचा एक्स-बॉयफ्रेन्ड म्हटले आणि हुमा बिथरली.काय होती बातमी
संबंधित न्यूज पोर्टलच्या बातमीत सोहेल खानला हुमाचे एक्स-बॉयफ्रेन्ड संबोधले होते. ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान हुमाचा सोहेल खान व त्याची पत्नी सीमा या दोघांशी आमना-सामना झाला. यावेळी ते एकमेकांना इग्नोर करताना दिसले. यादरम्यान हुमा व सोहेल एकमेकांपासून कायम अंतर राखून होते, असे या बातमीत लिहिले होते. २०१६ मध्ये हुमा व सोहेल यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. अर्थात हुमाने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते.

Web Title: Huma Qureshi blasts website for saying Sohail Khan and Seema ignored her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.