हृतिक रोशनला जिममध्ये पाहून सुजैन खान झाली खल्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 10:12 AM2019-04-21T10:12:46+5:302019-04-21T10:13:11+5:30

‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती.

Hrithik Roshan's Strenuous Workout Has A Fan In Sussanne Khan | हृतिक रोशनला जिममध्ये पाहून सुजैन खान झाली खल्लास!

हृतिक रोशनला जिममध्ये पाहून सुजैन खान झाली खल्लास!

googlenewsNext
ठळक मुद्दे  एकेकाळी हृतिक रोशन व सुजैन खान हे  बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी  एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला अनेकजण आपला आइडल मानतात. हेच कारण आहे की, अद्यापही हृतिकची क्रेज कमी झालेली नाही. गत वर्षभर हृतिक ‘सुपर 30’ या चित्रपटात बिझी होता. यात हृतिक गणितज्ज्ञ आनंद कुमारची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी हृतिकला सिक्स पॅक एब्स नाही तर एका सामान्य व्यक्तिसारखे शरीर हवे होते. साहजिकच ‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती. ती होती, हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिची.


होय, हृतिकला जिममध्ये घाम गाळताना पाहून आणि त्याचे पिळदार शरीर पाहून सुजैन स्वत:ला रोखू शकली नाही. मग काय, ‘तू २० वर्षांपूर्वी दिसत होता, त्यापेक्षाही अधिक हॉट दिसतो आहेस,’ असे सुजैनने लिहिले. एकंदर काय तर, हृतिकला पाहून सुजैनच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. सुजैनची ही स्थिती असेल तर हृतिकच्या चाहतींची कशी असेल,ही कल्पना तुम्ही करू शकताच.


  एकेकाळी हृतिक रोशनसुजैन खान हे  बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी  एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. अर्थात घटस्फोटानंतरही हृतिक व सुजैन आपल्या मुलांसोबत कधी एकत्र सुट्टी घालवताना तर कधी मुव्ही डेट वा डिनर डेट एन्जॉय करताना दिसते. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. 

Web Title: Hrithik Roshan's Strenuous Workout Has A Fan In Sussanne Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.