"अरे तो बोलो ना ऐसे" असभ्य वर्तन केल्याने हृतिक रोशनची सटकली, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 05:05 PM2021-02-01T17:05:43+5:302021-02-01T17:06:19+5:30

हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेला व्हिडीओ एका हॉस्पिटलमधला आहे. हॉस्पिटलच्या गेटवर त्याच्यासह एक व्यक्ती रागात बोलताना दिसत आहे.

Hrithik Roshan visits hospital with kids, gets angry at doorman Video Viral | "अरे तो बोलो ना ऐसे" असभ्य वर्तन केल्याने हृतिक रोशनची सटकली, व्हिडीओ व्हायरल

"अरे तो बोलो ना ऐसे" असभ्य वर्तन केल्याने हृतिक रोशनची सटकली, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

आजवर वेगवेगळ्या संकटांवर मात करत हृतिक रोशननं बॉलीवुडमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.  संकटं, भितीशी मुकाबला करत तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलाय. हृतिक रोशनचे चाहते जगाच्या कानाकोप-यात पसरलेत. सध्या हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेला व्हिडीओ एका हॉस्पिटलमधला आहे.

हॉस्पिटलच्या गेटवर त्याच्यासह एक व्यक्ती रागात बोलताना दिसत आहे. गेटकिपरने रागातच हृतिकला दुस-या दरवाजाने जायला सांगितले,काहीही कारण नसताना गेटकिपरचे हृतिकसह असे असभ्य वर्तन करणे त्यालाही चांगलेच खटकले, गेटकिपरचे अशा बोलण्याने हृतिकचाही पारा चांगलाच चढला होता आणि फार काहीही न बोलता  दुस-या दरवाजाने निघून गेला.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार हृतिक भगवान श्री रामप्रभूंची भूमिका साकारणार नाही तर लंकापती रावणची भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार हृतिकचे महाभारताच्या कथेवर आधारित द्रौपदी या चित्रपटाविषयी बोलणं सुरु होता पण काही कारणांमुळे हा चित्रपट सुरू होऊ शकला नाही. दरम्यान, मधु मंटेना यांच्या मेगा बजेट चित्रपटाची घोषणा केली पण एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिक यात रामची नव्हे तर रावणची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे.


याशिवाय निर्माता-दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपला ‘आदिपुरुष’ या थ्रीडी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. यात साऊथचा सुपरस्टार प्रभास श्रीराम मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर सैफ अली खानची एंट्री रावणच्या भूमिकेसाठी आहे. क्रिती सॅनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत कोणता चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि रावणांच्या भूमिकेमध्ये प्रेक्षक सैफला की ह्रतिकला पसंती देतायेत हे पाहणं उत्सुकतेचे ठरले.

Web Title: Hrithik Roshan visits hospital with kids, gets angry at doorman Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.