Hrithik Roshan new year celebration with Mika Singh video viral on internet | Hrithik Roshan चा न्यू ईअर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, मिका सिंगसोबत गायलं गाणं....

Hrithik Roshan चा न्यू ईअर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, मिका सिंगसोबत गायलं गाणं....

२०२१ वर्षाचं आगमन झालं आहे. जगभरातील लोक नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करत आहेत. सर्वांप्रमाणे हृतिक रोशनने सुद्धा नव्या वर्षाचं स्वागत धमाकेदार पद्धतीने केलं आहे. यानिमित्ताने त्याच्या घरी एका शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत हृतिकने तूफान डान्स केला तर गायक मिका सिंगच्या गायकीने जान आणली. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि मिका सिंगचा एक व्हिृडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

मिका सिंगने हृतिक रोशनसोबतचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच त्याने लिहिले की, 'Happy New Year....हृतिक रोशन, जायद खान, करण बावा आणि राकेश रोशनसोबत फारच  शानदार पार्टी झाली. तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. गुडबाय 2020, वेलकम 2021.' हा व्हिडीओ तीन लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय.

मिका सिंगने हृतिक रोशनसोबतचा फोटोही शेअर केला आहे. हृतिक या व्हिडीओत त्याच्या 'कहो ना प्यार है' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सोबतच गाणं गातही आहे. यात तो त्याची हूक स्टेपही करताना दिसतोय.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik Roshan new year celebration with Mika Singh video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.