Hrithik roshan and john abraham will be seen together in dhoom 4 deepika padukone will be seen in the role of lady villain | पहिल्यांदा ह्रतिक जॉन अब्राहमसोबत 'धूम 4'मध्ये दिसणार दीपिका पादुकोण,साकारणार लेडी व्हिलेनची भूमिका

पहिल्यांदा ह्रतिक जॉन अब्राहमसोबत 'धूम 4'मध्ये दिसणार दीपिका पादुकोण,साकारणार लेडी व्हिलेनची भूमिका

‘धूम’च्या चौथ्या सीझनचे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. सिनेमाच्या पहिल्या फ्रेंचायझीमध्ये जॉन अब्राहम, दुसर्‍या हृतिक रोशन आणि तिसऱ्यात आमिर खानने जबरदस्त अ‍ॅक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केले. रिपोर्टनुसार ‘धूम 4’मध्ये जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन एकत्र दिसू शकतात. याशिवाय दीपिका पादुकोण या सिनेमात लेडी व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

पहिल्यांदा दीपिका आणि जॉन दिसणार एकत्र
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "दीपिका आणि हृतिक गेली कित्येक वर्षे इंडस्ट्रीमध्ये आहेत. दोघांनीही आतापर्यंत एकाही सिनेमात एकत्र काम केले नाही. यशराज कित्येक वर्षांपासून या दोघांना एका प्रोजेक्टमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आता 'धूम 4'च्या माध्यमातून शक्य होईल. एकीकडे हृतिक पहिल्यांदाच दीपिकाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, तो पहिल्यांदा जॉनबरोबर काम करतानाही दिसणार आहे."

'धूम 4' ची कथा स्टाईलिश चोरवर आधारित असेल
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, "चौथ्या भागात प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळाला. यशराज फिल्म्सच्या 'धूम 4' ला आता आदित्य चोप्राला वेगळ्या पातळीवर नेण्याची इच्छा आहे. ज्यासाठी त्याने चित्रपटाच्या पटकथासाठी मनीष शर्माची निवड केली आहे. 'धूम 4' ची कथा एका सुंदर स्टायलिश चोर (दीपिका पादुकोण) वर आधारित असेल. या तीन कलाकारांच्या शूटिंगच्या तारखांविषयी प्रॉडक्शन हाऊसने चर्चा सुरू केली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. "

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik roshan and john abraham will be seen together in dhoom 4 deepika padukone will be seen in the role of lady villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.