सलमानचा मोस्ट वॉन्टेड Radhe Movie ऑनलाईन कसा पहायचा? झी5, डीटीएचवर पैसे कसे वाचवाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:55 AM2021-05-12T11:55:13+5:302021-05-12T12:09:18+5:30

Salman Khan's Radhe: Your Most Wanted Bhai ticket booking at attractive price: राधे मुव्ही प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे थिएटरमध्ये पाहता येणार नाहीय. तर तो ओटीट प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा (Radhe movie) लागणार आहे. असा मुव्ही बघण्याची भारतीयांसाठी ही तशी पहिलीच वेळ आहे. यामुळे राधे पाहण्यासाठीच्या अटी शर्ती माहिती असणे गरजेचे आहे.

How To Watch Salman khan's Most Wanted Radhe Movie Online? save money on Z5, DTH tickets? Find out ... | सलमानचा मोस्ट वॉन्टेड Radhe Movie ऑनलाईन कसा पहायचा? झी5, डीटीएचवर पैसे कसे वाचवाल? जाणून घ्या...

सलमानचा मोस्ट वॉन्टेड Radhe Movie ऑनलाईन कसा पहायचा? झी5, डीटीएचवर पैसे कसे वाचवाल? जाणून घ्या...

Next

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमानचा 'राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई' (Salman Khan's Radhe: Your Most Wanted Bhai) 13 मे रोजी रिलीज (Radhe release on 13th may, 2021) होत आहे. महत्वाचे म्हणजे हा मुव्ही प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे थिएटरमध्ये पाहता येणार नाहीय. तर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा (How to book Ticket of Radhe movie) लागणार आहे. असा मुव्ही बघण्याची भारतीयांसाठी ही तशी पहिलीच वेळ आहे. यामुळे राधे पाहण्यासाठीच्या अटी शर्ती माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा वेळ संपली तर राहिलेला भाग तुम्हाला पाहता येणार नाहीय. (How to watch Radhe movie online platform? see tips and trics )


राधे मुव्हीचे तिकीट कसे काढायचे? कसा पहायचा? एकालाच पाहता येणार का? घरातील साऱ्यांना पहायचा असेल तर वेगवेगळे तिकिट काढावे लागेल का? असे अनेक प्रश्न सलमान खानच्या चाहत्यांना पडले आहेत. आम्ही तुम्हाला या माहितीसोबतच काही ट्रिकही सांगणार आहोत, ज्या तुमचे पैसे वाचविणार आहेत. सलमान खानचा हा राधे मुव्ही उद्यापासून झी प्लेक्स (ZEEPlex) आणि झी 5 (ZEE5) वर पाहता येणार आहे. तसेच तुमच्या घरात असलेल्या डीश टीव्हीवर देखील पाहता येणारा आहे. यासाठी Dish, D2H, Tata Sky आणि Airtel Digital TV यांच्यासोबत टायअप करण्यात आलेले आहे. 


झी प्लेक्स किंवा झी5 वर कसा पहाल? (how to watch radhe on zee5, terms and conditions)
परंतू या साठी तुम्हाला एकतर झीचे प्रिमिअम पॅकेज घ्यावे लागेल किंवा डीटीएचवर या सिनेमासाठी तिकिट घ्यावे लागणार आहे. या एका तिकिटाची किंमत ही  249/- रुपये असणार आहे. राधे जर झीच्या अॅपवर पहायचा झाला तर एकावेळी एकालाच पाहता येणार आहे. राधे मुव्ही पाहण्यासाठी तुमच्याकडे झीचे सबस्क्रिप्शन नसेल तर त्यासाठी झीने मोठी ऑफर ठेवली आहे. 499 रुपयांच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला राधेचे एक तिकिट मिळणार आहे. जर तुम्ही आधीपासून सबस्क्रिप्शन घेतले असेल तर तुम्हाला फक्त 249 रुपयांचे तिकिट काढावे लागणार आहे. (how to watch radhe in 249 rupees single ticket on OTT Platform)

  • -राधेचे तिकीट घेतल्यास तो तुम्हाला 21 दिवसांत कधीही पाहता येणार आहे. महत्वाचे म्हणजे राधे मुव्ही पाहण्यास चालू केल्यापासून चार तासांत तो पाहून संपवावा लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वेळाने तुम्ही थोडा थोडा पार्ट पाहण्याचा प्रयत्न केल्यास आणि 4 तास संपल्यास पुन्हा तिकिट काढावे लागणार आहे. 
  • -राधे मुव्हीचे एक तिकिट काढल्यास तुम्ही तो मुव्ही एकावेळी दोन डिव्हाईसवर पाहू शकणार आहात. थिएटरमध्ये दोघांसाठी दोन वेगवेगळी तिकिटे काढावी लागतात. हे पैसे वाचणार आहेत. (How to save money on Radhe movie Ticket.)
  • समजा राधे तुम्हाला खूपच आवडला व पुन्हा पुन्हा पहावासा वाटला तर तुम्हाला पुन्हा दुसरे तिकिट काढावे लागणार आहे. (Radhe movie ticket terms and conditions.)


तिकिटाचे पैसे कसे वाचवाल? (Watch Radhe movie free, tips and tricks)

  • दोनपेक्षा जास्त जणांना राधे पहायचा असल्यास स्मार्ट टीव्ही हा उत्तम पर्याय आहे. यावर एकदाच तिकिट काढून घरातील सदस्य, मित्रमंडळींसोबत तुम्ही राधे हा मुव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो देखील पाहू शकता. (How to watch Radhe on Smart TV.)
  • जर तुमच्याकडे झीचे सबस्क्रिप्शन नाहीय आणि 499 ऐवजी 249 रुपयांतच राधेचे तिकिट घ्यायचेय तर एक पर्याय आहे. तुमच्याकडे फ्लिपकार्ट असेल आणि तुम्ही गोल्ड मेंबर असाल तर तुम्हाला खरेदीवर सुपर कॉईन भेटतात. त्यावर झी5 चे एका महिन्याचे 50 कॉईन देऊन सबस्क्रिप्शन मिळते. ते झी ५ वर रजिस्टर करावे आणि राधेचे तिकिट काढल्यास ही डील 249 रुपयांत होईल. (How How to watch Radhe on Zee5, FlipKart superCoin deal)

DTH वर कसे पहाल? (How How to watch Radhe On DTH platforms)

  • टाटा स्काय (Tata Sky ) - Channel #252, #253, #254, #255 वर जाहिरात येते. 
  • डीटूएच (d2h)- Channel 917(HD), 200 SD (Screen 1) आणि 199 (screen 2) SD वर जाहिरात येते. 
  • डीश टीव्ही (DishTV) - Channel 302 HD, 303 SD (Screen 1) and 301 SD (Screen 2) 
  • एअरटेल डिजिटल (Airtel Digital) - Channel #269, #270, #499, #500

या कंपन्यांच्या डीटीएचवर राधेचे तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही या चॅनेलवर दिलेल्या नंतरवर मिस कॉल देऊ शकता किंवा क्यू आर कोड, डीटीएच ऑपरेटरचे अॅप आणि वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तिकिट बुक करू शकणार आहात. 
 

महत्वाचे.....
डीटीएचवरदेखील तुम्हाला एका ठराविक वेळीच राधे पाहता येणार आहे. त्या चॅनेलला तुमचा मुव्ही पाहण्याचा सोईस्कर वेळ एसएमएसद्वारे तुमच्या ऑपरेटरला कळवू शकता. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How To Watch Salman khan's Most Wanted Radhe Movie Online? save money on Z5, DTH tickets? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app