ठळक मुद्देआमिर खानच्या धूम ३ या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यांची नेहमीच चर्चा केली जाते. पण या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यं आमिरने नव्हे तर त्याच्या स्टंटमनने दिली आहेत. 

चित्रपटात हाणामारीची दृश्य असली की, प्रेक्षकांना ती प्रचंड आवडतात. काहीजण तर अ‍ॅक्शन चित्रपटांच्या इतके प्रेमात असतात की, केवळ चित्रपटातील अ‍ॅक्शन पाहाण्यासाठीच ते चित्रपटगृहात हजेरी लावतात. ही अ‍ॅक्शन दृश्यं कशाप्रकारे चित्रीत केली जातात हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला चित्रपटात अ‍ॅक्शन दृश्य करताना नायक अथवा नायिका दिसतात. पण खऱ्या आयुष्यात अनेकवेळा ही अ‍ॅक्शन दृश्यं स्टंटमनद्वारे दिली जातात. ही दृश्यं कशाप्रकारे चित्रीत केली जातात हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

आमिर खानच्या धूम ३ या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यांची नेहमीच चर्चा केली जाते. पण या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यं आमिरने नव्हे तर त्याच्या स्टंटमनने दिली आहेत. 

सलमान खानच्या अ‍ॅक्शन दृश्यांवर त्यांचे चाहते फिदा असतात. त्याच्या अनेक चित्रपटात तो अनेक खतरनाक स्टंट करताना दिसतो. पण त्याच्या अनेक चित्रपटात तो स्वतः नव्हे तर त्याच्यासारखा दिसणारा मुलगा स्टंट करतो. 

शाहरुखच्या झिरो, फॅन, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील हाणामारींच्या दृश्यांची त्याचे फॅन्स नेहमीच तारीफ करतात. पण या चित्रपटातील दृश्यं त्याच्यावर नव्हे तर त्याच्या बॉडी डबलवर शूट करण्यात आली आहेत.

हृतिक रोशनने धूम २, बँग बँग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अतिशय खतरनाक अ‍ॅक्शन सीन दिले आहेत. हृतिकला स्वतःचे स्टंट स्वतःच करायला आवडतात. त्यामुळे तो अनेक चित्रपटांसाठी बॉडी डबलचा वापर करत नाही. केवळ मोहोनजोदाडो, बँग बँग, अग्निपथ, क्रीश, वॉर या चित्रपटातील त्याचे स्टंट खूपच कठीण असल्याने त्याने बॉडी डबलचा वापर केला होता. 

अक्षय कुमारला त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्टंट्ससाठी ओळखले जाते. त्याच्या अ‍ॅक्शन दृश्यांचे नेहमीच कौतुक केले जाते. अक्षय देखील त्याचे चित्रपटातील कठीणातील कठीण स्टंट देखील स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो. केवळ त्याने चांदनी चौक टू चायना या चित्रपटासाठी बॉडी डबलचा वापर केला होता. 


 

Web Title: This is how Action scenes shot in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.