बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'बद्दल लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन गाणं 'भूत' प्रदर्शित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या गाण्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील पहायला मिळतो आहे. यात तो तांत्रिकाच्या भूमिकेत दिसतो आहे.

'भूत' या गाण्याच्या व्हिडिओमध्ये बॉबी देओल, रितेश देशमुख, कृति सेनॉन, पूजा हेगडे व कृति खरबंदा यांना वाटतं की अक्षयला कोणत्यातरी भूताने आपल्या वशमध्ये केलं आहे. त्याला घेऊन सगळे तांत्रिक म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीकडे घेऊन जातात. यादरम्यान नवाजुद्दीन आपली तंत्र विद्याचा वापर करत अक्षयच्या अंगातील भूत बाहेर काढताना दिसतो. या गाण्यात नवाजुद्दीन आपले डान्स कौशल्य दाखवताना दिसतो आहे. मंत्र बोलत असताना मध्ये मध्ये आलिया भटचे नाव घेत आहे.


'भूत' हे गाणं फरहाद सामजीने लिहिलं आहे. या गाण्याला संगीत फरहाद सामजी व संदीप शिरोडकरने दिले आहे. या गाण्याला मिका सिंग व फरहाद सामजी यांनी स्वरसाज दिला आहे.

हे गाणं इंस्टाग्रामवर अक्षय कुमारने शेअर केले आहे आणि लिहिलं की, भीतीने लपू नका, आला फक्त तुम्हाला भेटायला भूत राजा.
'हाऊसफुल ४'मधील 'एक चुम्मा' आणि 'शैतान का साला' हे गाणं नुकतेच प्रदर्शित केले होते. या गाण्याला लोकांची खूप पसंती मिळाली. 


'हाऊसफुल ४' चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाज सामजीने केले असून हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Housefull 4: Nawazuddin escapes with ghost of Akshay in the name of Alia Bhat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.