ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी अमायराने मीटू मोहिमेवर बोलताना एक खळबळजनक खुलासा केला होता.

अभिनेत्री अमायरा दस्तूर नुकतीच संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ मध्ये दिसली. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण अमायराच्या ताज्या फोटोंनी मात्र कमाल केलीय. होय, सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या अमायराच्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.  
अमायराने ताज्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. केवळ तीन तासांत अमायराच्या या फोटोला 91 हजारांवर लाईक मिळाले आहेत.
बोल्ड अभिनेत्री अशी अमायराची ओळख आहे. तिचे हे ताजे फोटोशूटही तिच्या या स्वभावाला साजेसे आहे.

अमायराने २०१३ मध्ये इश्क या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. अनेक तामिळ चित्रपटातही तिने काम केले आहे.


काही महिन्यांपूर्वी अमायराने मीटू मोहिमेवर बोलताना एक खळबळजनक खुलासा केला होता.  पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरल्याचा शॉकिंग खुलासा तिने केला होता.

‘मी पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरले. पण त्यांची नावे जगजाहिर करून त्यांना जगासमोर उघडे करण्याची हिंमत माझ्यात नाही. ते इंडस्ट्रीतील शक्तीशाली व्यक्ती आहेत. मी कास्टिंग काऊचला बळी पडले नाही. पण याशिवाय बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी मी अत्याचार सहन केला.

एक दिवस मी नक्कीच याचा खुलासा करेल. पण जोपर्यंत मी स्वत:ला सुरक्षित समजत नाही, तोपर्यंत मी कुणाकडेही बोट दाखवणार नाही, असे अमायरा म्हणाली होती.


Web Title: Hotness Alert! amyra dastur showing latest bold look pics goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.