Hot Pics: Have you seen this hot trend of Malaika Arora? | Hot Pics : मलायका अरोराचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?
Hot Pics : मलायका अरोराचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?
मलायका अरोरा हे बॉलिवूडच्या सर्वांत हॉट मॉम्सपैकी एक नाव. एक उत्कृष्ट आयटम डान्सरसोबतच हॉट अदांनी फॅन्सना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही आपण तिला ओळखतो. अरबाजपासून वेगळं झाल्यानंतर ती आता तिचं ‘सिंगल’ असणं एन्जॉय करतांना दिसते आहे. नुकतीच ती तिच्या वांद्रे येथील जीमबाहेर पडताना अतिशय हॉट अंदाजात दिसून आली. ग्रे कलरचा टॉप, शॉर्ट पँट आणि स्पोर्टी शूज अशा ड्रेसिंगमध्ये ती मुंबईच्या रस्त्यांवर दिसली.  तेव्हा तिचा हा हॉट अंदाज माध्यमांचे फोटोग्राफर्स त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करायला कसं विसरतील? त्यासोबतच तिचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. अलीकडेच मलायका अरोरा अंबानींच्या पार्टीत आली होती. तेव्हा तिने घातलेला ड्रेस आणि तिचा हॉट अंदाज पाहून फॅन्स अवाक झाले. सोशल मीडियावर तिला फॅन्सनी चांगलेच ट्रोल केले. कमेंटसमध्ये तिला म्हटले, ‘बसं कर आता, पोरगं जवान झालं तुझं’ असं म्हणत फॅन्सनी तिला चांगलंच फटकारलं. त्यावर तिने कुठलीही कमेंट न करता शांत बसणंच शहाणपणाचं समजलं. मलायका अरोरा नेहमीच तिच्या गर्लगँगसोबतच पार्टी करताना आपल्याला दिसते. बी-टाऊनच्या पार्ट्यांमध्ये खासकरून करिना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा यांच्यासोबत पार्टी करत असते. 

मलाइकाने याचवर्षी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. मलाइका आणि अरबाजचा १५ वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव अरहान खान आहे. अरहानची कस्टडी मलाइकाकडे आहे. सध्या मलाइका इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी आगामी काळात ती काही रिअ‍ॅलिटी शोला जोडली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ‘दबंग’ सीरिजमध्येही ती पुन्हा सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. 
Web Title: Hot Pics: Have you seen this hot trend of Malaika Arora?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.