hindustani bhau got death threats from isi lieutenuant colonel bigg boss contestant tweet viral | शॉकिंग! हिंदुस्तानी भाऊला ISIकडून जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे भानगड

शॉकिंग! हिंदुस्तानी भाऊला ISIकडून जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे भानगड

ठळक मुद्देएकता कपूरच्या एका वेबसीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप नोंदवत हिंदुस्तानी भाऊने एकता व तिच्या आईविरोधात एफआयआर दाखल केला होता.

बिग बॉस 13’मुळे जबरदस्त हिट झालेला हिंदुस्तानी भाऊ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीला सपोर्ट केल्याने तो चर्चेत आला होता. यासाठी त्याने त्याचे टिकटॉक अकाऊंटही डिलीट केले होते. त्याच्या या अकाऊंटवर तब्बल 15 लाख  फॉलोअर्स होते. यानंतर हिंदुस्तानी भाऊ एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला होता.  ाॉलिवूडच्या एका मोठ्या स्टारला एक्सपोज करणार असल्याचे सांगत त्याने एकता कपूर व तिच्या आईविरोधात  एफआयआर दाखल केली होती. याच हिंदुस्तानी भाऊला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.


खुद्द त्यानेच ट्वीट करून ही माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये त्याने फोन नंबरही शेअर केलेत शिवाय थेट पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले. ‘आयएसआयच्या लेफ्टिनंट कर्नलने मला जीवे मारण्याची धमकी दिली. आमचे लोक तुझ्या शहरात पोहोचले आहेत, असे तो म्हणाला. हे ते नंबर्स आहेत, ज्यावरून मला धमक्या मिळत आहेत. माझ्याकडे या कॉल्सचे संपूर्ण रेकॉर्डिंग आहे,’ असे हिंदुस्तानी भाऊने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले.

अनुष्का शर्माच्या बुलबुल वेबसीरिजवर आक्षेप


एकता कपूरच्या एका वेबसीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर आक्षेप नोंदवत हिंदुस्तानी भाऊने एकता व तिच्या आईविरोधात एफआयआर दाखल केला होता. आता हिंदुस्तानी भाऊने अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘बुलबुल’ या वेबसीरिजवर आक्षेप नोंदवला आहे.  या सीरिजमधून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून या सीरिजवर आक्षेप घेत काही आरोप केले आहेत. या सीरिजमध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच अनुष्काची  ‘बुलबुल’ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी आणि राहुल बोस यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hindustani bhau got death threats from isi lieutenuant colonel bigg boss contestant tweet viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.