'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे.

 

त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.यासोबतच अक्षयने आता जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. अक्षयने वर्षाला 48.5 मिलियन डॉलर (36२ कोटी रुपये) कमाई करून फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या टॉप 10 च्या यादीच सहावे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये त्याने किंग खान शाहरुख खान आणि सलमानलाही मागे टाकले आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला 'लक्ष्मी' सिनेमानेहीबॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत विक्रम मोडत ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक बघितला गेलेला सिनेमा ठरला आहे. आता अक्षय लवकरच कृती सेनॉनसह 'बच्चन पांडे', सारा अली खान आणि धनुषसह 'अतरंगी रे', वाणी कपूरसह 'बेल बॉटम' आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसह 'पृथ्वीराज' या चित्रपटात झळकणार आहे. सिनेमांव्यतिरिक्त प्रॉडक्ट एंडोर्समेंटमधूनही अक्षयची कमाई होत असते.

अक्षय आज यशशिखरावर आहे तरीही त्याच जीवन सरळ साध्या मार्गाने जगतो. त्याच्या वागण्या, बोलण्यात कुठलाही बडेजावपणा जाणवत नाही. इतकंच नाही तर सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्याच्या मनात वेगळे स्थान आहे. त्यामुळे आपल्या कमाईचा बहुतांशी हिस्सा हा लष्काराच्या शूर जवानांसाठी दान करतो. इतकंच नाही तर विविध सामाजिक कार्यातही अक्कीचा पुढाकार असतो. शिवाय मोजक्या करदात्या सेलिब्रिटींमध्येही तो आघाडीवर असतो.

आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे अक्षयने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो..त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल खिलाडींयो का खिलाडी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Higest Earning Actor 2020: Akshay Kumar Became The Sixth Highest Paid Actor In The World By Earning $ 48.5 Million, Salman, Shah Rukh Are Behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.