ठळक मुद्देया ट्रेलरमध्ये सलमान ॲक्शन करताना दिसत आहे. त्याचसोबत त्याचा डान्स, त्याचा कॉमिक अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

सलमान खानच्यादबंग 3 या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दबंग 3 च्या ट्रेलरमध्ये चुलबूल पांडे म्हणजेच सलमान खान आपल्याला बोलताना दिसत आहे की, एक असतो पोलिस आणि एक असतो गुंड... पण मला हाक मारली जाते पोलिसवाला गुंड... त्यानंतर त्याच्यासोबत काम करणाऱ्या एक पोलिस त्याला प्रमोशनबद्दल विचारत आहे. त्यावर तो त्याच्या हाताला गोळी मारताना आपल्याला दिसत असून इतरांना तुम्हाला देखील प्रमोशन हवे आहे का असे चुलबुल पांडे विचारत आहे... हे ऐकताच त्यांच्यातील एक पोलिस चुलबुल पांडेला आय लव्हू यू बोलताना दिसत आहे आणि चुलबूल पांडे देखील आय लव्ह यू टू म्हणत त्याला रिप्लाय देत आहे. 

या ट्रेलरमध्ये आपल्याला सोनाक्षी देखील दिसत असून ही माझी पत्नी सुपर सेक्सी रज्जो असल्याचे चुलबूल बोलताना दिसत आहे. कोणीही दबंग स्वतःहून होत नाही यामागे एक कथा नक्कीच असते असे चुलबूल बोलल्यानंतर त्याचा भूतकाळ आपल्याला पाहायला मिळत असून त्यात आपल्याला सई मांजरेकरला पाहायला मिळत आहे. चुलबूलच्या भूतकाळात सई आणि चूलबूल यांचे एकमेकांवर प्रेम होते हे आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाचा खलनायक सुदीप देखील या ट्रेलरमध्ये दिसत असून खूप सारी ॲक्शन सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत.  

या ट्रेलरमध्ये सलमान ॲक्शन करताना दिसत आहे. त्याचसोबत त्याचा डान्स, त्याचा कॉमिक अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मीच मारणार आणि मीच वाचवणार हा चुलबूल पांडेच्या संवादातूनच या चित्रपटात त्याचा अंदाज कसा असणार हे आपल्याला कळत आहे. तसेच दबंगच्या दोन्ही भागात सलमानचा गॉगल पाठीमागे लावण्याच्या स्टायलची चांगलीच चर्चा झाली होती. ट्रेलरमध्ये तर हाताने उडवत तो गॉगल थेट कॉलरला लावत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen the rich trailer of Salman Khan's Dabangg 3 movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.