‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:06 PM2019-10-01T13:06:01+5:302019-10-01T13:08:56+5:30

वादग्रस्त राखी काही दिवसांपूर्वी तिच्या कथित लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली. एका अनिवासी भारतीयाशी लग्न केल्याचा दावा राखीने केला होता.

Have you seen Rakhi Sawants Pic with Her Sister | ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय?, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

googlenewsNext

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. नुकतंच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राखीसोबत आणखी एक तरुणी दिसत आहे. राखीचा आणि फोटोतील या तरुणीचा चेहरा मिळताजुळता आहे. ही तरुणी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून राखी सावंत हिची बहीण आहे. राखीच्या बहिणीचं नाव उषा सावंत असं आहे. दोघी बहिणींनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. शिवाय दोघींनी परिधान केलेले दागदागिनेसुद्धा मिळते जुळते आहेत. 


राखी आणि तिच्या बहिणीच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. वादग्रस्त राखी काही दिवसांपूर्वी तिच्या कथित लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली. एका अनिवासी भारतीयाशी लग्न केल्याचा दावा राखीने केला होता. यावरून मोठा वादंगही झाला. राखीच्या रथित बॉयफ्रेंडने या सगळ्या प्रकारानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. याशिवाय छप्पन्न छुरी या आयटम साँगमधील ट्रान्सपरन्ट ड्रेसवरूनही राखीवर टीकेची झोड उठली. 

राखीच्या घरी हलणार पाळणा, पतीचा फोटो दाखवल्यानंतर आता म्हणते मी होणार आई

राखी  सिक्रेट मॅरेजबाबत रोज एक नवा खुलासा करत असते. नुकताच तिने फॅन्सना तिचा पती ओळखण्याचा टास्क दिला होता. तर काही दिवसांपूर्वी राखीने ती पतीकडे इंग्लंडला पोहोचल्याचे सांगितले होते. आता पुन्हा राखीने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने स्वत: प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला आहे. हा एक फनी व्हिडीओ आहे. यात राखी तिच्या पतीला ती प्रेग्नेंट असल्याचे सांगतेय.

 

यावर तो म्हणतोय हे कसं होऊ शकतं मी तर इंग्लंडला आहे.'' यावर राखी फनी एक्सप्रेशन्स देतेय. राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे.आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले होते. 

Web Title: Have you seen Rakhi Sawants Pic with Her Sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.