Haseen Dillruba Trailer: तापसी पन्नूचा बोल्ड अवतार पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:54 PM2021-06-11T13:54:03+5:302021-06-11T13:56:05+5:30

Haseen Dillruba Trailer Out : होय, ‘हसीन दिलरूबा’ या आगामी थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

haseen dillruba trailer out taapsee pannu vikrant massey and harshvardhan rane in a love conspiracy | Haseen Dillruba Trailer: तापसी पन्नूचा बोल्ड अवतार पाहून व्हाल थक्क

Haseen Dillruba Trailer: तापसी पन्नूचा बोल्ड अवतार पाहून व्हाल थक्क

Next
ठळक मुद्देतूर्तास या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूडची ‘लेडी अक्षय कुमार’ नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तूर्तास तिचा पडद्यावरच्या बोल्ड अंदाजाची चर्चा आहे. होय, ‘हसीन दिलरूबा’ या आगामी थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या ट्रेलरमध्ये तापसीचा यापूर्वी कधी न दिसलेला बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.
चित्रपटात तापसी पन्नू शिवाय विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) व हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) मुख्य भूमिकेत आहेत.  या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे. तापसी व विक्रांत पती-पत्नीच्या भूमिकेत आहे. याचदरम्यान तापसीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणेची एन्ट्री होते. (Haseen Dillruba Trailer Out) 

ट्रेलरच्या सुरूवातीलाच तापसी विक्रांतला प्रश्न करते. ‘आपने दिनेश पंडित की किताब पढ़ी है? क्या लिखते हैं, छोटे-छोटे शहरों में बड़े-बड़े कतल करा देते हैं, पता ही नहीं चलता,’असे ती म्हणते आणि यानंतर तापसीच्या घरात मोठा ब्लास्ट होतो. यात विक्रांत मेस्सीचा मृत्यू होतो. येथून कथा पुढे सरकते. पोलिसांचा पहिला संशय तापसीवर जातो.

पुढे काय होते, हे पाहण्यासाठी तुम्हाला  आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या 2 जुलैला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होतोय. ट्रेलरमध्ये अनेक लव्ह मेकिंग सीन्स आहेत.
तूर्तास या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय. सोशल मीडियावर ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: haseen dillruba trailer out taapsee pannu vikrant massey and harshvardhan rane in a love conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app