ठळक मुद्दे‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

एकेकाळी अभिनेता हर्षवर्धन राणे व अभिनेत्री किम शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा बी-टाऊनमध्ये जोरात होत्या. हर्षवर्धन किमच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि प्रेमाच्या चर्चा हवेत विरल्या. या ब्रेकअपचीही जोरदार चर्चा झाली. अर्थात हे ब्रेकअप का झाले, हे अद्याप गुलदस्त्यात होते. आता मात्र हर्षवर्धनने पहिल्यांदा ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला आहे.
टाइम्सनाऊला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन पहिल्यांदा त्याच्या व किमच्या नात्यावर बोलला. किमसोबतच्या ब्रेकअपसाठी हर्षवर्धनने स्वत:ला जबाबदार ठरवले. आमच्या नात्यात जी काही गडबड झाली ती माझ्या ‘डीएनए’मुळे झाली, असे हर्षवर्धन म्हणाला.

‘किम आयुष्यात येण्याआधी जवळपास 12 वर्षे मी सिंगल होतो. यामागे काही कारण होते. कारण नसल्याशिवाय काहीही घडत नाही. यानंतर किम आयुष्यात आली. मी तिला डेट करू लागला. ती पृथ्वीवरची सर्वात फन लव्हिंग महिला आहे. मी तिच्यासोबत खरोखर खूप मस्त वेळ घालवला. पण एका वळणावर हे नाते संपले. यासाठी मी स्वत:ला दोष देईन. माझा डीएनए यासाठी जबाबदार आहे. ‘रंग दे बसंती’ या सिनेमात आजादी मेरी दुल्हन है, असा एक डायलॉग आहे. मी सिनेमा मेरी दुल्हन है असे म्हणेल. हेच माझे रिलेशनशिप आहे,’असे हर्षवर्धनने सांगितले.  

सध्या हर्षवर्धन अभिनेत्री संजीदा शेखला डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्थात हर्षवर्धनने अद्याप याबद्दल काहीही सांगितलेले नाही.
 डिसेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा हर्षवर्धन व किम यांच्या डेटींगच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर बाईक राईडपासून ते हॉलिडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे कपल एकत्र दिसू लागले होते. मात्र त्यांचे हे नाते फार दिवस तग धरु शकले नाही.  

‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
किम शर्मा बद्दल सांगायचे तर ती कधीच बॉलिवूडमधून बाद झाली आहे. मोहोब्बतें, नहले पे दहला, मनी है तो हनी है, कुडियों का है जमाना यांसारख्या चित्रपटांमध्ये किम झळकली आणि अचानक बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. अर्थात हर्षवर्धनसोबतच्या अफेअरमुळे ती पुन्हा चर्चेत आली होती. 

किम शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला थ्रोबॅक बिकिनी फोटो, एक्स बॉयफ्रेंड क्रिकेटर युवराज सिंगने केले तिला ट्रोल

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: harshvardhan rane opened up for the first time on his breakup with kim sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.