अभिनेत्री किम शर्माने तिचा थ्रोबॅक बीचवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत किमने बिकनी घातलेली दिसतेय. हातात एक सर्फबोर्ड धरला आहे आणि मनगटात एक गॅझेट घातले आहे. किमच्या या फोटोवर एक्स-बॉयफ्रेंड आणि क्रिकेटर युवराज सिंगने मजेदार कमेंट केली आहे. 

किमने फोटो शेअर करत लिहिले, "समुद्र किनाऱ्यावर पूर्ण दिवस राहण्यापेक्षा अजून काय चांगले असू शकते? काहीही नाही." युवराजने किमच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले, "गांव बसा नहीं बस्ता लेकर पहुंच गई हैं मॅडम.'' युवराजच्या या कमेंटवर किमने रिअॅक्शन दिली आहे. तिने लिहिले, 'इंग्लिश प्लीज' म्हणजेच इंग्रजीत कमेंच कर. 

किम आणि युवराज कथित अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते त्यानंतर 2007मध्ये ते वेगळे झाले. किम शर्मा अजूनही सिंगल आहे तर युवराजने अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले. युवराज आणि हेजलसोबत किमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

अलीकडेच किम गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करायला गेली होती. इन्स्टाग्रामवर तिने गोव्यात स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर तिने 2000 मध्ये आलेल्या मोहब्बतें सिनेमातून डेब्यू केला होता.  या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली. 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kim sharma shared bikini photos ex boyfriend and cricketer yuvraj singh funny comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.