happy bithday karan johar when actor talk on his sexuality-ram | ‘गे’ असण्यावर करण जोहरने पहिल्यांदा केला होता खुलासा, माजली होती खळबळ

‘गे’ असण्यावर करण जोहरने पहिल्यांदा केला होता खुलासा, माजली होती खळबळ

ठळक मुद्देसध्या करणकडे ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना 2’ हे सिनेमे आहेत. या सिनेमांची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार आहे.

निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशी ओळख असलेला करण जोहर याचा आज वाढदिवस. करणने बॉलिवूडमध्ये अपार यश मिळवले़ पण या व्यावसायिक यशात त्याच्या खासगी आयुष्याचीही मोठी भूमिका राहिली. सेक्स, रिलेशन्स, दोस्ती अशा सगळ्यांमुळे तो सतत चर्चेत राहत आला आहे. आपल्या सेक्स लाईफवर करणने सुरूवातीला मौन बाळगणे पसंत केले. सेक्शुअ‍ॅलिटीवरून तो अनेकदा ट्रोलही झाला. पण एक वेळ अशी आली की, करणने सगळ्याच गोष्टींचा खुलासा केला. होय, अगदी फिल्मी करिअरपासून ते सेक्स लाइफपर्यंत अगदी बिनधास्त तो बोलला. ‘An Unsuitable Boy’ या ऑटोबायोग्राफीत यावरचे अनेक खुलासे त्याने केलेत. मी होमोसेक्शुअल, बायोसेक्शुअल असलो तरी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा जन्म सेक्स या विषयावर बोलण्यासाठी झालेला नाही. लोक माझ्या सेक्स लाईफबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. पण मला यावर ओरडून काहीही सांगण्याची गरज नाही, असे तो म्हणाला होता.

'गे' म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला होता

सेक्स लाईफवरून करणला अनेकदा ट्रोल व्हावे लागले. गत वर्षी एका युजरने अशाप्रकारे त्याला ट्रोल करायचा प्रयत्न केला होता. मात्र करणने त्याला सडेतोड उत्तर दिले होते.
‘ करण तुझ्यावर ‘करण- द गे’ असा एक सिनेमा तयार करायला हवा,’ असे या युजरने लिहिले होते. युजरचे हे ट्वीट पाहिल्यावर करण जोहर जाम भडकला होता़. पण तरीही त्याने संयम राखत या युजरला उपरोधिक शब्दात सडेतोड उत्तर दिले होते. ‘तू खरंच जिनिअस आहेस. या विषयी ट्विटरवरून आवाज उठवल्याबद्दल तुझे आभार,’ असे करणने त्यावर लिहिले होते. करणच्या या ट्विटनंतर इतर अनेक ट्विटर युजर्सनी त्याला पाठिंबा दिला होता.

26 व्या वर्षी गमावली व्हर्जिनिटी
 ‘अ‍ॅन अनसुटेबल बॉय’ पुस्तकात करणने त्याच्या सेक्सुअल अनुभवाविषयी बेधडक लिहिले होते.  वयाच्या २६व्या वर्षी मी पहिला सेक्सुअल अनुभव घेतला होता. यासाठी मला पैसेही चुकवावे लागले. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये मी माझी व्हर्जिनिटी गमावली होती. पहिल्यांदा हा अनुभव घेण्यासाठी गेलो़, मी पैसे चुकवले. पण काहीही केले नाही. आठवडाभरानंतर पुन्हा एकदा तो अनुभव घेण्यासाठी मी गेलो. पण माझा अनुभव फार चांगला नव्हता. त्यावेळी हा सगळा प्रकार मूर्खपणाचा असल्याचे मला जाणवले. समोरची व्यक्ती केवळ बनावट पद्धतीने आपल्यासोबत वेळ घालवतो, हे सगळे मूर्खपणाचे होते, असे करणने यात लिहिले होते. करणच्या या खुलाशानंतर सगळीकडे खळबळ माजली होती.

सध्या करणकडे ‘तख्त’ आणि ‘दोस्ताना 2’ हे सिनेमे आहेत. या सिनेमांची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करणार आहे. यापूर्वी रिलीज झालेला करण जोहरचा ‘कलंक’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: happy bithday karan johar when actor talk on his sexuality-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.