'Happy Birthday Iggy Potter': Sara Ali Khan wishes brother Ibrahim with adorable post, shares unseen pics | ट्रोल होऊ नये म्हणून साराने भावाला अशा पद्धतीने केले बर्थ डे विश, एकदा पाहाच

ट्रोल होऊ नये म्हणून साराने भावाला अशा पद्धतीने केले बर्थ डे विश, एकदा पाहाच

गेल्याच वर्षी भाऊ इब्राहिम खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने बिकीनीसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र सारा या फोटोमुले जबरदस्त ट्रोल झाली होती. तिला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. चाहत्यांना साराचा तो फोटो फारच खटकला होता. त्यांनी फोटोवरून तिला चांगलंच सुनावलं होतं.  त्यामुळे या वर्षी असे होवू नये म्हणून आधीच खबरदारी घेतल्याचे साराने दिसतंय. 


यावेळी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र यावेळी सा-यांच्या पसंतीस पात्र ठरावा असा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच साराच्या गेल्यावर्षीचा फोटोही चाहत्यांना आठवला त्यामुळे साराने ती चूक केली नाही तसेच यावेळी नेटकऱ्यांना सारा आणि इब्राहिममधलं हे बॉण्डिंगही आवडलं असून तिच्या या फोटोवर भरभरुन लाईक्स आणि कमेंटस देत पसंती दिली आहे. 


सैफ अली खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान म्हणाला होता, त्याची नेहमीच इच्छा होती की त्याचा मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी. त्याची सारा आणि इब्राहिम या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करावे ही इच्छा होती. सैफ म्हणाला की, त्याची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं. मुलगी सारा अली खान आधीच बॉलिवूडमध्ये काम करत आहे. आणि तिचे 'केदारनाथ', 'सिंबा' आणि 'लव्ह आज काल' हे ' कुली नं १' सिनेमे आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Happy Birthday Iggy Potter': Sara Ali Khan wishes brother Ibrahim with adorable post, shares unseen pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.