गोविंदाच्या या हिरोईनने आजारी पतीसाठी सोडले करिअर, आता आहे तीन मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 08:00 AM2021-01-24T08:00:00+5:302021-01-24T08:00:02+5:30

90 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली...’  हे बॉलिवूड सॉन्ग तुम्हाला आठवत असेलच. यात गोविंदाची हिरोईन होती रितु शिवपुरी.

govinda actress ritu shivpuri life interesting facts | गोविंदाच्या या हिरोईनने आजारी पतीसाठी सोडले करिअर, आता आहे तीन मुलांची आई

गोविंदाच्या या हिरोईनने आजारी पतीसाठी सोडले करिअर, आता आहे तीन मुलांची आई

googlenewsNext
ठळक मुद्दे 2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितुने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केलेत.

90 च्या दशकातील ‘लाल दुप्पटेवाली...’  हे बॉलिवूड सॉन्ग तुम्हाला आठवत असेलच. यात गोविंदाची हिरोईन होती रितु शिवपुरी. ही रितु आज बॉलिवूडमधून गायब झालीये. गोविंदासोबतचा ‘आंखें’ हा रितुचा पहिला सिनेमा. 1993 साली रिलीज झालेल्या या सिनेमानंतर रितुचा एकही सिनेमा कमाल दाखवू शकला नाही. 2006 पर्यंत रितुने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. पण यश मिळत नाही म्हटल्यावर ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. आजारी पतीसाठी तिने करिअर सोडले.

आँखे चित्रपटानंतर रितु शिवपुरीने ब-याच चित्रपटात काम केले. हम सब चोर हैं, आर या पार, भाई भाई, हद कर दी आपने,  लज्जा, शक्ति: द पावर  व  ऐलान  या सिनेमात ती दिसली.

रितु ही अभिनेता ओम व सुधा शिवपुरी यांची मुलगी. हरी व्यंकटसोबत रितुने लग्न केले. तिला तीन मुलं आहेत. रितुचे आईवडील आधीच बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. त्यामुळे इंडस्ट्री म्हणजे तिच्यासाठी दुसरे घर होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर रितुने मॉडेलिंग सुरु केले. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिले आणि ‘आंखें’ हा सिनेमा तिला आॅफर केला. यावेळी ती 17 वर्षांची होती.

 2006 मध्ये बॉलिवूड सोडल्यानंतर रितुने छोट्या पडद्यावर नशीब आजमावण्याचे प्रयत्न केलेत. एका टीव्ही शोमध्ये ती दिसली. पण यासाठी तिला 18 ते 20 तास काम करावे लागायचे. ती कामावरून घरी परतायची तेव्हा पती झोपलेला असायचा.  करिअरच्या नादात रितुचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. अखेर रितुने अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

 यानंतर काही वर्षांनी पुन्हा तिने बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिच्या पतीचे आजारपण आडवे आले. होय, पतीच्या पाठीत ट्युमर झाल्याचे निदान झाले आणि त्याच्यासाठी रितुने करिअरवर पाणी सोडले. करिअरपेक्षा पतीचे आयुष्य महत्त्वाचे आहे, असा विचार करून तिने कमबॅकचा विचार सोडून दिला. अर्थात मुलं मोठी झाल्यावर 2016 साली अनिल कपूरच्या ‘24’ या शोमधून तिने वापसी केली.
रितूने बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर ज्वेलरी डिझायनर म्हणून काम केले.

 

Web Title: govinda actress ritu shivpuri life interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.