Good news for Urvashi Rautela fans, to star in an international film | उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

बॉलिवूडची अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय ब्युटी क्वीन आणि सुपर मॉडेल उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऐस्लाडोस’. एका आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा भाग होत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, याचा उर्वशीला अभिमान वाटतो. 

उर्वशी रौतेला आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली, "मला खूप अभिमान वाटतो आहे की मी माझ्या देशाचे व पूर्ण आशियाला आंतरराष्ट्रीय पदावर नाव गाजवले आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये आरोग्याच्या संकटाचा सामना करून जगभरातील जीवन दाखविण्यात आले आहे.


ती पुढे म्हणाली, ही डॉक्युमेंट्री सुमारे ३० देशांचा प्रवास करेल आणि या महिन्यांत नवीन जीवनशैली प्रतिबिंबित करेल. ही चार भागाची मिनी-डॉक्युमेंटरी मालिका आहे जी या आत्ता आपण ज्या अत्यंत विरोधाभासी वास्तविकतेमधून जात आहोत त्याबद्दलचे सत्य दाखवते. या कठीण काळात मानव वंशाची ताकद आणि आशा दर्शवते. आपण हे सर्व युट्युब वर पाहू शकतात.


आणखी एक स्वप्न साकार झाल्यामुळे उर्वशीला अशा प्रतिष्ठित प्रकल्पात सहभागी झाल्याचा आनंद आहे. लुइसिटो कोमुनिका आणि जुआन्पा झुरिता यांनी मिनी डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे, आणि मारियानो डी वायो, सेबास व्हिलालोबस, लोगन पॉल, जॉर्ज क्रेमाडेस, ट्वान कुइपर, जेन सेल्टर, केसी निस्ताट आणि बरेच इतर हॉलिवूड चेहरे या मिनी डॉक्युमेंटरीचा भाग आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good news for Urvashi Rautela fans, to star in an international film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.