Good News Movie released on this date | 'गुड न्यूज'ची डिलिवरी डेट आली समोर, आलिया-रणबीरसोबत होणार सामना

'गुड न्यूज'ची डिलिवरी डेट आली समोर, आलिया-रणबीरसोबत होणार सामना

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ते दोघे 'गुड न्यूज' या चित्रपटात झळकणार आहेत. त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पोस्टर, टीझर किंवा ट्रेलर अद्याप प्रदर्शित करण्यात आलेले नाही. मात्र नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

अक्षय कुमार व करीना कपूरचा आगामी सिनेमा 'गुड न्यूज'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर ही घोषणा केली आहे. त्याने एक पोस्टर शेअर केला आहे. ज्यात पुढील वर्ष चांगले जाण्यासाठी देतोय 'गुड न्यूज'. २७ डिसेंबरला भेटूयात. 

'गुड न्यूज' चित्रपट रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे आणि या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतो आहे. या चित्रपटात अक्षय व करीना यांच्याव्यतिरिक्त दलजीत दोसांझ व कियारा आडवणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अक्षय कुमार व करीना कपूर या जोडीची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती आणि पुन्हा एकदा 'गुड न्यूज' चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट व रणबीर कपूर, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आता प्रेक्षक गुड न्यूज व ब्रह्मास्त्र या दोन्ही पैकी कोणत्या चित्रपटाला जास्त प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good News Movie released on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.