Good News! दिया मिर्झाने दिला गोंडस बाळाला जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:41 AM2021-07-14T11:41:53+5:302021-07-14T11:42:37+5:30

दिया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे.

Good News! Dia Mirza gave birth to a cute baby, a mother born two months ago | Good News! दिया मिर्झाने दिला गोंडस बाळाला जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झाली आई

Good News! दिया मिर्झाने दिला गोंडस बाळाला जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झाली आई

Next

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा मागील बऱ्याच काळापासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली होती. आता दियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, दोन महिन्यांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला आहे. १४ मे रोजी तिला मुलगा झाला असून ज्याचे नाव अव्यान आझाद आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

दिया मिर्झाने सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिले की, तिच्या मुलाचा जन्म १४ मे रोजी prematurely ( प्रेग्नेंसी तारखेच्या आधी) झाला होता आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर आज दिया मिर्झाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
दियाने सांगितले की, प्रेग्नेंसीदरम्यान तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते आणि जीव जाईल अशी अवस्था होती. अशात इमरजन्सीमध्ये सी सेक्शनच्या माध्यमातून बाळाचा वेळेआधीच जन्म झाला होता. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 


दिया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखी आपल्या मुलाचे घरी जंगी स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दियाने पोस्टमध्ये म्हटले की, मुलाचे आजी आजोबा आणि बहिण समायरा त्याला कुशीत घेऊन खेळवण्यासाठी खूप उत्सुक आहेत.


दियाने पुढे म्हटले की, माझे शुभचिंतक आणि चाहत्यांचे मी आभार मानते. तुमची काळजी आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जर ही न्यूज आधी शेअर करणे शक्य असते तर आम्ही नक्कीच केली असती. तुमचे प्रेम, विश्वास आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. दियाच्या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मलायका अरोराने हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर बिपाशा बासूने लिहिले की, प्रेम, प्रेम, प्रेम आणि खूप सारे प्रेम.

दिया मिर्झाने १५ फेब्रुवारी, २०२१ ला बिझमेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

Web Title: Good News! Dia Mirza gave birth to a cute baby, a mother born two months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app