Genelia Dsouza reveals what people said when she was marrying to Riteish Deshmukh | जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं!

जेनेलिया डिसुजाने सांगितले, रितेशसोबत लग्नावेळी काय-काय ऐकावं लागलं होतं!

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजाने ८ वर्षांआधी लग्न केलं होतं. या दोघांनाही बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्समध्ये गणलं जातं. लग्नानंतर जेनेलिया घर सांभाळण्यात व्यक्ती झाली आणि सिनेमापासून दूर झाली. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा हे म्हणत होते की, दोघेही फार लवकर लग्न करत आहेत. आता जेनेलियाने सांगितले की, रितेशसोबत लग्नावेळी तिला लोकांकडून काय-काय ऐकावं लागलं होतं.

जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, लग्नावेळी लोकांनी तिला असं करण्यास मनाई केली होती. ती म्हणाली की, लोक तिच्या आजूबाजूला येऊ सांगत होते की, लग्नानंतर  तिचं करिअर संपेल. पण त्यावेळी जेनेलियाने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. कारण त्यावेळी जेनेलियाला रितेशसोबत लग्न करायचंच होतं. लग्नानंतर जेनेलिया घरात आणि मुलांमध्ये बिझी झाली. 

तसं रितेश आणि जेनेलियाने एकत्र हिंदी सिनेमात डेब्यू केलं होतं. २००३ मध्ये आलेला 'तुझे मेरी कसम' सिनेमा दोघांचा पहिला सिनेमा होता. तेव्हापासून दोघानी एकमेकांना डेट करणं सुरू केल होतं. यानंतर दोघे २०१२ मध्ये लग्न बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलियाला दोन मुलं रियान आणि राहिल आहेत. 

लग्नानंतर जेनेलिया काही सिनेमात दिसली. जॉन अब्राहमसोबत तिने एका सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर ती रितेशच्या मराठी सिनेमा पाहुणी कलाकार म्हणूनही दिसली आहे. आता ती निर्माती झाली आहे आणि दोघेही लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Genelia Dsouza reveals what people said when she was marrying to Riteish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.