Gauri Khan Badly Slammed For Sharing A Vulgar Painting On Twitter | गौरी खानने ट्विटरवर केला अश्लील फोटो पोस्ट, लोकांनी विचारले वेडी झाली आहेस का?
गौरी खानने ट्विटरवर केला अश्लील फोटो पोस्ट, लोकांनी विचारले वेडी झाली आहेस का?

ठळक मुद्देगौरीच्या मते ही पेटिंग एक अतिशय उत्तम कलाकृती आहे. पण या पेटिंगद्वारे गौरी न्यूडीटिला प्रोत्साहन देत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पेंटिग अतिशय अश्लील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शाहरुख खानचा झिरो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर शाहरुख चित्रपटांपासून दूर असून त्याने काही महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. सध्या तो सगळा वेळ त्याच्या कुटुंबियांना देत आहे. तो सध्या त्याची पत्नी गौरी खानसोबत मालदीवला गेला असून सुट्टी एन्जॉय करत आहे. गौरी त्यांच्या या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. पण तिने नुकत्याच ट्विटरला पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिला नेटिझन्सने चांगलेच धारेवर धरले आहे. 

गौरीने ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक प्राचीन कलाकृती असलेल्या एका पेंटिंगचा फोटो शेअर केला होता. हा फोटो अतिशय अश्लील आहे असे सुनावत तिला नेटिझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. गौरीची ओळख ही केवळ शाहरुख खानची पत्नी इतकीच नाहीये तर ती एक प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर असून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची घरं तिने आजपर्यंत सजवली आहेत. तिने ट्विटरवर एक पेटिंग शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने ब्लॅक ड्रामा असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच #robertoferri #interiordesign #design #decor हे टॅग देखील दिले आहेत. पण हा फोटो नेटकऱ्यांना आवडलेला नाहीये असेच म्हणावे लागेल. 

गौरीच्या मते ही पेटिंग एक अतिशय उत्तम कलाकृती आहे. पण या पेटिंगद्वारे गौरी न्यूडीटिला प्रोत्साहन देत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही पेंटिग अतिशय अश्लील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर अशी पेटिंग कोणी घरी लावतं का तू वेडी झाली आहेस का... असे देखील नेटकऱ्यांनी तिला विचारले आहे. तू कितीही पुढारलेल्या विचारांची असलीस तरी अशी पेटिंग घरात लावणे योग्य वाटते का असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे. तसेच अशा प्रकारच्या पोस्टमुळे गौरी शाहरुख खानचे नाव बदनाम करत असल्याचे देखील नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.  

गौरीला या पेटिंगवरून ट्रोल केल्यानंतर तिने आता ही पोस्ट सोशल मीडियावर डीलिट केली आहे.  

Web Title: Gauri Khan Badly Slammed For Sharing A Vulgar Painting On Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.