'गदर' चित्रपटातील छोटा सरदार आठवला का ? आता दिसतो फारच हँडसम, प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 05:40 PM2021-08-14T17:40:09+5:302021-08-14T17:47:50+5:30

'गदर एक प्रेमकथा' सिनेमा रिलीज होऊन २० वर्षे पूर्ण झाली तरी आजही सिनेमाची जादू कायम आहे.सिनेमाची कथा कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे सिनेमाने रसिकांची विशेष पसंती मिळवली होती.

Gadar Movie, do you remember the Small boy played Sardar Role, know how handsome he has turned now | 'गदर' चित्रपटातील छोटा सरदार आठवला का ? आता दिसतो फारच हँडसम, प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

'गदर' चित्रपटातील छोटा सरदार आठवला का ? आता दिसतो फारच हँडसम, प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

Next

बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सारे रेकॉर्ड तोडणा-या गदर एक प्रेमकथाचा डायलॉग आजही रसिकांच्या डोक्यात फिट्ट आहे.ज्या वेळी बॉलीवुडमध्ये शंभर कोटी क्लबची रेस नव्हती तेव्हा गदरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला...सिनेमा रिलीज होऊन २० वर्षे पूर्ण झाली तरी आजही सिनेमाची जादू कायम आहे.

सिनेमाची कथा कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे सिनेमाने रसिकांची विशेष पसंती मिळवली होती. सिनेमात सनी देओल, आमिषा पटेल, अमरिश पुरी यांच्यासह आणखी एका कलाकारचे विशेष कौतुक झाले होते तो होता बालकलाकार उत्कर्ष शर्मा.

 छोटा सरदार बनत उत्कर्षने चोख भूमिका निभावली होती. त्यावेळी तो ७ वर्षांचा होता. आता तो २६ वर्षांचा झाला आहे आणि तो याच सिनेमाचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या व्यतिरिक्त, त्याने ‘जीनियस’ या सिनेमामध्ये तो झळकला होता. २०१८ साली त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. 

तसेच उत्कर्ष हा अभिनेत्री इशिता चौहानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. इशिता उत्कर्षसोहत जीनिस सिनेमातही झळकली आहे. इशितानेही बालकलाकार म्हणूनच सुरुवात केली होती.  2007 आणि 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'आपका सुरुर' आणि 'हायजॅक' सिनेमात ती झळकली आहे. 

उत्कर्ष आणि इशिता दोघांनीही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आगामी काळात दोघेही कोणत्या सिनेमात झळकणार हे पाहणेही रसिकांसाठी औत्सुक्याचे असेल.सोशल मीडियावर दोघेही प्रचंड सक्रीय असतात.

त्यांचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. आत्ताचे दोघांचे लूक पाहून बालपणात साकारलेल्या भूमिकांमध्ये झळकलेले हेच का ते ? असे प्रश्नही तुम्हाला पडतील. दोघांचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 

Web Title: Gadar Movie, do you remember the Small boy played Sardar Role, know how handsome he has turned now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app