Gadar चित्रपटात Sunny Deol, Ameesha Patel यांना नव्हती पहिली पसंती; या कलाकारांकडे केलं होतं अप्रोच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:08 AM2021-10-16T09:08:15+5:302021-10-16T09:13:05+5:30

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत.

gadar 2 sunny deol ameesha patel not first choice for tara sakina makers approached these actors | Gadar चित्रपटात Sunny Deol, Ameesha Patel यांना नव्हती पहिली पसंती; या कलाकारांकडे केलं होतं अप्रोच

Gadar चित्रपटात Sunny Deol, Ameesha Patel यांना नव्हती पहिली पसंती; या कलाकारांकडे केलं होतं अप्रोच

Next
ठळक मुद्दे२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत.

२००१ मध्ये गदर: एक प्रेमकथा (Gadar: Ek prem katha) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिटही ठरला होता. आता तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करत याचा मोशन पोस्टर रिलिज करण्यात आला आहे. लवकरच या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करण्यात येणार असून यामध्ये पूर्वीप्रमाणेच मुख्य भूमिकेत सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. परंतु यापूर्वी आलेल्या गदर या चित्रपटात मुख्य भूमिकांसाठी सनी देओल आणि अमिषा पटेल हे पहिली पसंती नव्हते.

चित्रपटात तारा आणि सकीना यांची मुख्य भूमिका साकारण्यासाठी सनी देओल आणि अमिषा पटेल हे पहिली पसंती नव्हते. त्यांच्या जागी चित्रपट निर्मात्यांनी अन्य कलाकारांना पसंती दिली होती. तुम्हाला जाणून कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु या चित्रपटासाठी यापूर्वी काजोल (Kajol) आणि गोविंदा (Govinda) यांना अप्रोच करण्यात आलं होतं. अनिल शर्मा यांच्या डोक्यात चित्रपट लिहिताना हीच दोन नावं होती. अनिल शर्मा हे या दोघांकडे चित्रपटाची कथाही घेऊन गेले होते. परंतु त्याच्याकडे चित्रिकरणासाठी तारखा उपलब्ध नव्हत्या. "मी गोविंदाला महाराजा चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कथा ऐकवली होती आणि कथा ऐकून त्यांना भीतीही वाटली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात हा चित्रपट कसा होईल असा प्रश्न त्यांना पडला होता," असं शर्मा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

 
"पाकिस्तानला रिक्रिएट करण्याचा प्रकार चित्रपटामध्ये यापूर्वी कधीच घडला नव्हता. काजोल ही एकमेव अभिनेत्री होती जिच्याकडे मी कथा घेऊन गेलो होतो. परंतु नंतर या चित्रपटासाठी सनी देओल आणि अमिषा पटेल यांची निवड करण्यात आली," असंही ते म्हणाले. त्यांनी चित्रपटात सकीना आणि ताराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मोठा हिट ठरला होता. आजही लोकांकडून या चित्रपटाला तितकीच पसंती मिळते.

Web Title: gadar 2 sunny deol ameesha patel not first choice for tara sakina makers approached these actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app