Forensic report prepared by the cbi team will be conclusive in sushant singh rajput death case | सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या हातात आल्यापासून प्रत्येक अँगलने तपसाणी होते आहे. सीबीआय या प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची मदत सुद्धा घेते आहे. त्यामुळे हे कळण्यास मदत होईल की सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. लवकरच फॉरेन्सिक रिपोर्ट समोर येणार आहेत. 


टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या रिपोर्टमुळे सुशांत प्रकरणात असलेला गुंता सोडवण्यासाठी मदत होईल. हा रिपोर्ट काही दिवसात देण्यात येईल. या रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले आहे की फॉरेन्सिक तज्ञांच्या वैद्यकीय मंडळाची बैठक 17 सप्टेंबरला होणार आहे.या बैठकीत हा रिपोर्ट सादर केला जाईल आणि सुशांतच्या 'हत्ये'च्या अँगलवर प्रकाश टाकला जाईल. फॉरेन्सिक रिपोर्टसाठा एम्समधील डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. 

रियावर दाखल करणार मुकेश छाबडा केस 
सीबीआयसोबत सुशांत प्रकरणाची चौकशी एनसीबीसुद्धा करते आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने अनेक सेलिब्रेटींची नावं घेतली आहेत.  हे लोक ड्रग्स घेत असल्याचा दावा रियाने केला. यातील एक मोठं नाव म्हणजे निर्माता-दिग्दर्शक मुकेश छाबडा. आता मुकेश छाबडा रिया विरोधात केस करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश छाबडा रिया चक्रवर्तीवर सूडाची भावनेसोबत बदनाम करण्याची केस दाखल करू शकतो. यावर आपली बाजू मांडताना मुकेश छाबडा म्हणाला की, 'मी कधीच दारूही प्यायलो नाही तर ड्रग्सचा विषयच येत नाही. रियाने माझं नाव केवळ सूड घेण्यासाठी घेतलंय. आणि तिने ज्यांचही नावे घेतली ती सुद्धा तिने अशीच घेतली आहेत'.

 अनेक ड्रग पेडलर्सना अटक
 अनेक ड्रग पेडलर्सना एनसीबीने आतापर्यंत अटक केली आहे. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्स कार्टेलशी त्याचा संबंधही समोर आला आहे. सोमवारीच एनसीबीने हाय-फाय ड्रग्स पार्टीचा संबंध असलेल्या शोविकचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याला ताब्यात घेतले आहे. एनसीबी आता सूर्यदीपची चौकशी करेल, ज्यात बर्‍याच नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहित आज तकने दिली आहे.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Forensic report prepared by the cbi team will be conclusive in sushant singh rajput death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.