forbes 2019 highest paid actor list akshay kumar on 4th position dwayne johnson on tops | Forbes List : अक्षय कुमारवर ‘लक्ष्मी’ची कृपा, वर्षभरात कमावले इतके कोटी

Forbes List : अक्षय कुमारवर ‘लक्ष्मी’ची कृपा, वर्षभरात कमावले इतके कोटी

ठळक मुद्देया यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो ‘द रॉक’ अर्थात हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉनसन.

जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत अक्षय कुमारने चौथ्ये स्थान पटकावले आहे. फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगभरातील सर्वाधिक मानधन घेणा-या कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड स्टार आहे. अक्षयने ब्रॅडली कॉपर, विल स्मिथ, जॅकी चॅन अशा हॉलिवूड स्टार्सला मागे टाकत या यादीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

 1 जून 2018 ते 1 जून 2019 दरम्यान अक्षयने अंदाजे 465 कोटी कमावले. गतवर्षी या यादीत अक्षय कुमार सातव्या क्रमांकावर होता. सोबत सलमान खान नवव्या क्रमांकावर होता. पण यंदा सलमानला सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 कलाकारांच्या  यादीत स्थान मिळू शकले नाही.
 अक्षय बॉलिवू़डमध्येही सर्वाधिक कमाई करणारा आणि मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट नुकताच प्रसदर्शित झाला. या चित्रपटाने ११४ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. येत्या वर्षभरात अक्षयचे सूर्यवंशी, गूड न्यूज,लक्ष्मी बॉम्ब, बच्चन  पांडे,  हाऊसफुल्ल ४  यांसारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

द रॉक ठरला अव्वल


या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो ‘द रॉक’ अर्थात हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉनसन. तर क्रिस हेम्सवर्थ दुस-या स्थानावर आहे. अव्वल स्थान मिळवलेल्या ड्वेनची एकूण कमाई ही ६३९ कोटी आहे.  जुमांजी आणि फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस अशा अ‍ॅक्शन मसाला चित्रपटात काम केल्यानंतर ड्वेनची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. फोर्ब्सची ही यादी सेलिब्रेटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते.  
 

world's highest-paid actors (The top 10):

1-ड्वेन जॉनसन ($89.4 million)
2-क्रिस हेम्सवर्थ ($76.4 million)
3-रॉबर्ट डाउनी जूनियर ($66 million)
4-अक्षय कुमार  ($65 million)
5-जॅकी चॅन  ($58 million)
6-ब्रॅडली कूपर  ($57 million)
7-एडम सैंडलर ($57 million)
8-क्रिस एवंस ($43.5 million)
9-पॉल रुड ($41 million)
10-विल स्मिथ ($35 million)

Web Title: forbes 2019 highest paid actor list akshay kumar on 4th position dwayne johnson on tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.