ठळक मुद्दे२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. फिल्मफेअर अवार्डच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड नट्यांचा जलवा पाहायला मिळाला. बॉलिवूड ललनांचे वेगवेगळे ग्लॅमरस लूक, हटके ड्रेस आणि तितक्याच हटके अदांनी सर्वांना वेड लावले. पण सर्वाधिक हटके राहिला तो अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ड्रेस. तिच्या या ड्रेसची चांगलीच चर्चा झाली.
या सोहळ्यात उर्वशीने रेड कलरचा गाऊन घातला होता. तिचा हा गाऊन इतका जड आणि मोठा होता की, तो सावरायला अख्ख्या सोहळ्याभर दोन तीन लोकांची टीम खपत होती. उर्वशीला बसण्यासाठी चार खुर्च्याची मदत घ्यावी लागली.


उर्वशीने स्वत: या ड्रेसमधील एक व्हिडीओ शेअर केला. ‘माझ्या शानदार टीमशिवाय हे शक्य नव्हते. सर्वाधिक हेवी रेड कार्पेट अनुभव. चार खुर्च्याही कमी पडल्यात,’असे तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले. लाल गुलाबांच्या फुलांसारखा दिसणारा हा ड्रेस बनवण्यासाठी 730 तास लागलेत, अशी माहितीही तिने दिली.


उर्वशी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरचे तिचे हॉट फोटो आणि व्हिडीओ अधिक चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो शेअर करण्याची एकही संधी ती सोडत नाही. इन्स्टाग्रामवर तिचे 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.


२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.
‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली.  भाग जानी, सनम रे अशा चित्रपटातही ती झळकली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: filmfare awards 2020 urvashi rautela sat on 4 seats after wearing this red gown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.