ठळक मुद्देदोस्ताना 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटात फतेह दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंगने काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये काम केले होते. विंदूचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव फतेह रंधावा आहे. फतेह आता लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून करण जोहर त्याला लाँच करणार आहे.दोस्ताना 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. याच चित्रपटात फतेह दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. फतेह दिसायला अतिशय सुंदर असून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून तो मेहनत घेत आहे.फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.त्याचदरम्यान विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला होता. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता. पण या दुराव्यामुळेच आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांना जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. त्यांना लग्नानंतर एकच वर्षांत मुलगा झाला. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 

Web Title: Farha Naaz & Vindu Dara Singh's son Fateh to come in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.