ठळक मुद्देआज 15 वर्षांनंतर फरदीन कुठे आहे तर इंडस्ट्रीतून बाद झालाय आणि त्याच्या पाठीमागची दीपिका कुठे पोहोचलीये तर यशाच्या शिखरावर.

बॉलिवूडची दुनियाच न्यारी. इथे कधी कोणाचे नशीब बदलेल, हे सांगता यायचे नाही. आता हेच बघा ना, दीपिका पादुकोण आज बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस आहे. कधीकाळी हीच दीपिका पादुकोण एक बॅकग्राऊंड मॉडेल होती. आज दीपिका एका सिनेमासाठी लाखो, कोटी रूपये चार्ज करते, पण एकेकाळी हीच दीपिका बॉलिवूड स्टार्सच्या मागे कुठेतरी लपलेली दिसायची. हे सांगायचे कारण म्हणजे, एक 15 वर्षे जुना फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. हा फोटो आहे दीपिकाचा. यात ती बॅकग्राऊंड मॉडेल म्हणून दिसतेय.

फोटो एका फॅशन शोचा आहे. या शोचा शो स्टॉपर कोण होता तर अभिनेता फरदीन खान. त्याकाळी फरदीन खान मोठा स्टार होता. त्याच्या नावावर काही हिट सिनेमे होते, अनेक सिनेमे रिलीज होणार होते. साहजिकच त्याची इंडस्ट्रीत चलती होती. त्यामुळे शो स्टॉपर कोण तर फरदीन खान. याऊलट दीपिका सीनमध्ये कुठेही नव्हती. बॅकग्राऊंड मॉडेल इतकीच तिची ओळख होती. व्हायरल होत असलेल्या जुन्या फोटोत ती फरदीनच्या मागे उभी आहे.

आज 15 वर्षांनंतर फरदीन कुठे आहे तर इंडस्ट्रीतून बाद झालाय आणि त्याच्या पाठीमागची दीपिका कुठे पोहोचलीये तर यशाच्या शिखरावर. इंडस्ट्रीत नशीब बदलणे म्हणतात, ते यालाच.
बॉलिवूड अभिनेता फरदीन खान गेल्या 4 वर्षांपासून ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. 2016 नंतर फरदीन बॉलिवूडमधून जणू गायब झाला. मध्यंतरी तो पुन्हा दिसला पण त्याला पाहून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. होय, वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखताही येईना. 

1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे फरदीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फरदीनच्या वडिलांनी म्हणजे फिरोज खान यांनीच हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. अगदी पदार्पणालाच फरदीनच्या वाट्याला फ्लॉप सिनेमा आला. यानंतर यशाची चव चाखायला त्याला 2000 सालची वाट पाहावी लागली. 2000 साली रिलीज झालेल्या ‘जंगल’ या सिनेमाने फरदीनला ओळख दिली. या चित्रपटातील फरदीनच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बॉक्स आॅफिसवरही हा सिनेमा हिट झाला. 

दीपिकाचे म्हणाल तर दीपिकाने ‘ओम शांती ओम’मधून डेब्यू केला. पुढे कॉकटेल, बाजीराव मस्तानी, राम लीला, ये जवानी है दीवानी, पद्मावत असे अनेक हिट सुपरहिट सिनेमे तिने दिलेत. आज ती बॉलिवूडची लीडिंग लेडी म्हणून ओळखली जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fardeen khan was the show stopper and deepika padukone was background model this old pic is getting viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.