बॉलिवूड अभिनेत्रींचे करियर अभिनेत्यांपेक्षा जास्त काळासाठी नसते. अनेक अभिनेत्री करिअरमध्ये येणारे अपयश म्हणा किंला लग्न केल्यानंतर संसारात रमतात. त्यामुळे बॉलिवूडपासून काहीसे दुर्लक्ष होते परिणामी कधी त्या बॉलिवूडमधून गायब होतात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. हिट सिनेमा दिल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी लग्न करत बॉलिवूडला बाय बाय केले आहे.  याच यादीत अभिनेत्री आरती छाब्रियादेखील गणली जाते. 


आरती छाब्रिया 21 नोव्हेंबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. आरती छाब्रियाने अवघ्या तीन वर्षापासूनच  काम करायला  सुरुवात केली होती.  300 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. आरतीने मॅगी नूडल्स, पेप्सोडेंट टूथपेस्ट, क्लीन अँड क्लीअर फेस वॉश, अमूल आईस्क्रीम आणि क्रॅक क्रीम यासह अनेक ब्रँडची जाहिरातीत ती झळकली आहे.

 


आरतीने तिच्या संगीत अल्बम 'नशा ही नाशा है, हॅरी आनंदच्या' चहात 'आणि अदनान सामी यांच्या गाण्यांमध्ये झळकत रसिकांची वाहवा मिळवली होती. आरतीने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत काम केले. २००२ साली प्रदर्शित झालेला 'तुमसे अछा कौन है' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 

आरतीच्या मुख्य चित्रपटांमध्ये 'लज्जा', 'आवारा पागल दिवाना', 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे'  यांचा समावेश आहे. आरतीने हिंदीव्यतिरिक्त कन्नड, तेलगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र  या चित्रपटांमधून तिपा  फारसे यश मिळालेले नाही. आरती अखेर 2010 मध्ये ‘दस तोला’ या चित्रपटात दिसली होती. 

टीव्ही कार्यक्रमातही ती भाग घेत असे. आरती 2011 मध्ये 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. या व्यतिरिक्त 'झलक दिखला जा' आणि 'डर सबको है'  शोमध्ये देखील भाग घेतला होता. आरतीने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात काम करणारे कर सल्लागार विशारदशी लग्न करत तिथेच स्थायिक झाली.

 

आरतीने गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. या दोघांचे लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. तेव्हा तिच्या लग्नाची बातमी समोर आली होती. आरतीने आता स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले असले तरीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत  तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: famous Actress Aarti Chabria had suddenly left Bollywood, Moved abroad after her marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.