famous actor surendra bantwal murdered over financial issues found dead in his apartment | शॉकिंग : अपार्टमेंटमध्ये आढळला अभिनेत्याचा मृतदेह, शरीरावर चाकूचे वार

शॉकिंग : अपार्टमेंटमध्ये आढळला अभिनेत्याचा मृतदेह, शरीरावर चाकूचे वार

ठळक मुद्दे 2018 साली सुरेंद्रचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली होती.  

फिल्मी दुनियेतून एकापाठोपाठ धक्कादायक बातम्या समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा निकाल लागला नसतना आता आणखी एका अभिनेत्याच्या  मृत्यूने फिल्मी दुनियेत खळबळ माजली आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुरेंद्र बंतवाल राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला.  त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार आढळून आलेत. घरात सोफ्यावर त्याचा मृतदेह आढळला.
मीडिया रिपोर्ट्समध्ये सुरेंद्र बंतवालची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पैशाच्या व्यवहारातून सुरेंद्रची हत्या झाल्याचा कयासही व्यक्त करण्यात आला आहे.अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी याबाबत कुठलेही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेले नाही.

सुरेंद्र बंतवालच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनीही अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही.
 सुरेंद्रने ‘टुल्लू फिल्म चली पोलिलू’ आणि ‘सवर्ण दीर्घा संधी’ अशा अनेक सिनेमांत दमदार भूमिका साकारल्या होत्या. अलीकडे त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता, असे कळते.
 2018 साली सुरेंद्रचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली होती.  

  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: famous actor surendra bantwal murdered over financial issues found dead in his apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.