family friend revealed shabana azami was lying on her back seat with a safety belt otherwise it could have hurt | तर मोठा अनर्थ घडला असता...! शबाना आझमी यांच्या मित्राने केला मोठा खुलासा

तर मोठा अनर्थ घडला असता...! शबाना आझमी यांच्या मित्राने केला मोठा खुलासा

ठळक मुद्देशनिवारी पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला शनिवारी अपघात झाल्याची बातमी आली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. ट्रकवर शबाना आझमींची कार धडकली आणि या अपघातात शबाना आझमींच्या डोळ्याला आणि डोक्याला मार लागला. सध्या शबाना यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतेय. याचदरम्यान शबाना यांच्या एका फॅमिली फ्रेन्डने एक मोठा खुलासा केला आहे. 

होय, दैनिका भास्करला दिलेल्या मुलाखतीत शबाना यांचे कौटुंबिक मित्र अतुल तिवारी या अपघाताबद्दल बोलले. ‘शबाना सध्या एकदम ठीक आहेत. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. योगायोग चांगला होता, म्हणून अपघाताच्या अगदी काही क्षण आधी शबाना यांनी सीटबेल्ट लावला होता. सीटबेल्ट लावून त्या शांतपणे मागच्या सीटवर पहुडल्या होत्या. त्याचवेळी अचानक अपघात झाला.  सीटबेल्ट लावल्यामुळेच  त्यांना फार गंभीर इजा झाली नाही. सीटबेल्ट लावला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. ’असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे शबाना यांना रात्रभर जागरण झाले होते. त्या थकलेल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी जावेद अख्तर यांच्या गाडीत न जाता मधल्या गाडीत जाण्याचे ठरवले होते. मधल्या गाडीत शांतपणे झोपू शकेल, असे म्हणून शबाना त्या गाडीत बसल्या होत्या.
दरम्यान कोकिलाबेन रुग्णालयात सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पुढच्या 48 तासांनंतर डॉक्टर रुग्णालयातून डिश्चार्ज देण्याबाबत सांगतील अशी अपेक्षा आहे.
शनिवारी पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. याप्रकरणी आता ट्रक चालकाने आझमी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: family friend revealed shabana azami was lying on her back seat with a safety belt otherwise it could have hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.