ठळक मुद्देसाजिद खान अलीकडे ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपात अडकला होता. अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्या ब्रेकअपला जवळजवळ सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. हे दोघे एकेकाळी एकमेकांना डेट करत होते, हेही लोक एव्हाना विसरले असतील.  2009 मध्ये ‘हाऊसफुल 2’ या चित्रपटाच्या सेटवरून दोघांच्या अफेअरच्या होऊ लागल्या होत्या. 
जॅकलिनला बॉलिवूडमध्ये मोठी अभिनेत्री व्हायचे होते. साजिदने तिला यासाठी मदत केली. त्यामुळे जॅकलिनला ‘हाऊसफुल’ आणि ‘हाऊसफुल 2’ सिनेमात ब्रेक मिळाला होता. याकाळात दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. 

इतके की ‘हाऊसफुल 2’ च्या सेटवर जॅकलिनला वहिनी म्हणून हाक मारायचे. पण पुढे जॅकलिनला साजिदच्या पझेसिव्हनेसमुळे त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले.  पण आता हे नाते पुन्हा एकदा जिवंत होताना दिसतेय.

होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, भूतकाळ विसरून जॅक व साजिद पुन्हा एकदा जवळ येत आहेत. नुकताच साजिद जॅकला भेटायला ‘मिसेज सिरियल किलर’ या वेबसीरिजच्या सेटवर गेला होता. याठिकाणी दोघांनीही मनसोक्त गप्पा केल्यात आणि यानंतर साजिदने स्वत: जॅकला घरी सोडून दिले. एकंदर काय तर साजिद आणि जॅक पुन्हा एकदा सगळे काही विसरून नवी सुरुवात करण्याच्या मूडमध्ये दिसताहेत. 

साजिद खान अलीकडे ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपात अडकला होता. अनेक महिलांनी त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातून त्याची हकालपट्टी झाली होती. तो इंडस्ट्रीपासून दूर जात असल्याचे वाटत असतानाच जॅक पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात आली, असे म्हणायला हरकत नाही. आता फक्त ही नवी मैत्री कुठल्या वळणावर जाते ते बघूच.

Web Title: ex-couple sajid khan jacqueline fernandez recently met on mrs serial killer set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.