Ex-Bigg Boss contestant Digangana Suryavanshi was attacked by a peacock video | Video : ‘पिकॉक’ने कर दिया ‘शॉक’! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला

Video : ‘पिकॉक’ने कर दिया ‘शॉक’! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला

ठळक मुद्देटीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती.

‘बिग बॉस 9’ची स्पर्धक आणि अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी ((Digangana Suryavanshi ) तिच्या अभिनयासोबतच सौंदयार्साठीही ओळखली जाते. याच सौंदर्याच्या जोरावर दिगांगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. ‘जलेबी’ या चित्रपटातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला. सध्या दिगांगनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. होय, दिगांगनाला मोर दिसला आणि त्याचे सौंदर्य पाहून ती हरवून गेली. पण नंतर काय तर मोराने हल्ला केला आणि यात दिगांगना  किरकोळ जखमी झाली. (Digangana Suryavanshi was attacked by a peacock)
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दिगांगनाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. अंगणात मोर पाहून दिगांगना अगदी देहभान विसरून त्याला न्याहाळताना दिसते. याचदरम्यान ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि मोर तिच्यावर हल्ला करतो.अचानक झालेल्या या हल्ल्याने दिगांगनाची अशी काही घाबरगुंडी उडते की, तिची आई तिच्या मदतीला धावून येते.

दिगांगनाच्या या व्हिडीओवर युजर्सनी एकापेक्षा एक भारी कमेंट्सही केल्या आहेत. पिकॉक ने कर दिया शॉक, असे लिहित एका युजरने तिची मजा घेतली.

टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. बिग बॉसच्या 9 व्या सीझनमध्ये दिगांगना स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र 57 व्या दिवशी ती या शोमधून बाद झाली होती. ‘जलेबी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. यानंतर ‘फ्राय डे ’ या सिनेमातही ती झळकली. मात्र बॉलिवूडमध्ये तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या ती साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच सीटीमार आणि वल्यम या सिनेमात ती दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ex-Bigg Boss contestant Digangana Suryavanshi was attacked by a peacock video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.