ठळक मुद्देमी या चित्रपटाचा भाग नाहीये, या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेले अनेक लोक त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे आता हे शक्य नाहीये. पण या प्रोजेक्टला माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेत. 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट होऊन काही महिने झाले असून ते दोघे आता जुन्या गोष्टी विसरून आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अरबाज सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत फिरताना दिसत आहे तर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा आहे. त्या दोघांनी आता आपले नाते मीडियासमोर मान्य देखील केले आहे.

सध्या दबंग ३ या चित्रपटाचे सलमान खान चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाचे याआधीचे दोन्ही भाग प्रचंड हिट झाले होते. आता दबंग ३ या चित्रपटात आपल्याला सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडे या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दबंग या चित्रपटाच्या दोन्ही भागात असलेले आयटम साँग प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. दबंग या चित्रपटात मलायका अरोरा मुन्नी बदनाम या गाण्यावर थिरकताना दिसली होती. या चित्रपटात आयटम साँग करण्यासोबतच ती या चित्रपटाची निर्माती होती. तिने अरबाज खानसोबत या चित्रपटाची निर्मिती केली होती. 

दबंग ३ या चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे. पण मलायका या चित्रपटाची सहनिर्माती असणार आहे का असा प्रश्न तिला नुकताच विचारण्यात आला होता. याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले आहे की, मी या चित्रपटाचा भाग नाहीये, या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेले अनेक लोक त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे आता हे शक्य नाहीये. पण या प्रोजेक्टला माझ्या शुभेच्छा नक्कीच आहेत. 

मलायकाने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा आपल्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला होता. मलायकाने अर्जुन कपूरचे नाव न घेता सांगितले होते की, हे खूप अद्भूत आहे. जेव्हा माझं लग्न तुटलं तेव्हा मी पुन्हा कोणत्या रिलेशनशीपमध्ये पडेन, असे मला वाटले नव्हते. मी नात्यात पडले तर माझं मन पुन्हा दुखावेल, ही भीती माझ्या मनात होती. पण खरे सांगू तर मला एक रिलेशनशीप हवे होते आणि मला ते मिळाले. मी आता खूप खूश आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Everyone has moved on': Malaika Arora reiterates on co-producing Salman-Arbaaz Khan's 'Dabangg 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.