emraan-hashmi-to-star-in-hindi-remake-of-hit-malayalam-film-ezra | इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये
इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये

सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. शाहिद कपूरचा तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर सिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर आता आणखीन एक साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा करण्यात आली आहे. मल्याळम चित्रपट एज्राचा हिंदी रिमेक येणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत होते आणि हिंदी रिमेकमध्ये पृथ्वीराजची भूमिका इमरान हाश्मी साकारणार आहे. 

२०१७ साली प्रदर्शित झाला मल्याळम चित्रपट एज्रा एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात पृथ्वीराज व प्रिया आनंद मुंबईहून केरळला स्थलांतरित होतात. तिथे ते एक अँटिक बॉक्स विकत घेतात आणि हा बॉक्स खोलल्यानंतर त्यांच्या जीवनात विचित्र गोष्टी घडू लागतात. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता हा चित्रपट हिंदीमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर सांगितले की, मल्याळम सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट एज्राच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत इमरान हाश्मी दिसणार आहे.
 एज्राच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक जय कृष्णनन करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई व मॉरिशसमध्ये होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, कृष्णा कुमार व अभिषेक पाठक करणार आहेत.

या चित्रपटात इमरान हाश्मीची वर्णी लागल्याचे समजले. मात्र कोण अभिनेत्री असणार, हे अद्याप समजू शकलेले नाही.


Web Title: emraan-hashmi-to-star-in-hindi-remake-of-hit-malayalam-film-ezra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.