ठळक मुद्देसलमानच्या राधेसोबतच अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब देखील 22 मेलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.

सलमानचा दबंग ३ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सलमान आता राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान आणि दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे. राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 22 मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे.

सलमानच्या राधेसोबतच अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब देखील 22 मेलाच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा बच्चन पांडे हे दोन्ही चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होते. पण आता दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्लॅश होऊ नयेत यासाठी अक्षयने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली होती. पण आता राधे आणि लक्ष्मी बॉम्ब बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार आहेत. लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ईदच्या आधीच प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट देखील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान आणि ईद यांचे नाते खूपच जवळचे आहे. नेहमीच ईदच्या मुहूर्तावर सलमान त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणतो आणि सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरतो. पण आता अक्षयच्या लक्ष्मी बॉम्बमुळे सलमानच्या अडचणीत वाढ झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण सलमान इतकेच फॅन फॉलोव्हिंग अक्षयला देखील असून त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहात असतात. 

Web Title: On Eid 2020, Salman Khan's Radhey: Your Most Wanted Bhai and akshay kumar's'Laxmi Bomb' will clash PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.