'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 07:00 AM2020-07-17T07:00:00+5:302020-07-17T07:00:03+5:30

'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करतानाचा इमरान हाश्मीचा किस्सा खूप चर्चेत आला होता.

During the intimate scene in 'Murder', Imran Hashmi lost control of himself, then something like Mallika Sherawat did ... | 'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही...

'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही...

googlenewsNext

बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. इमरान हाश्मीचा मर्डर हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहेत. या चित्रपटातील त्याचे व अभिनेत्री मल्लिका शेरावतचे बोल्ड सीन्सची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. या चित्रपटात इंटिमेंट सीन्सचा खूप भडीमारा होता. या चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करतानाचा इमरान हाश्मीचा किस्सा खूप चर्चेत आला होता.

मर्डर चित्रपट त्याकाळातील सर्वात बोल्ड सिनेमा होता. महेश भट दिग्दर्शित या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स होते. मात्र एक सीन शूट करत असताना इमरान हाश्मीचा स्वतःवरील ताबा सुटला होता आणि तो स्वतःला रोखू शकला नव्हता. मल्लिका शेरावत या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे तिने यानंतर इमरान हाश्मीसोबत पुन्हा न काम करण्याची शप्पथ घेतली होती आणि या चित्रपटानंतर ते दोघेच कधीच दुसऱ्या सिनेमात दिसले नाहीत.


मर्डर चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. इमरान हाश्मीला देखील या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.

तसेच या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. असे असले तरी मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकाने या सिनेमानंतर इमरान सोबत पुन्हा काम न करण्याचे निश्चित केले होते.

Web Title: During the intimate scene in 'Murder', Imran Hashmi lost control of himself, then something like Mallika Sherawat did ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.