ठळक मुद्देसध्या फरहीन एक यशस्वी बिझनेसवूमन म्हणून ओळखली जाते.

अक्षय कुमारचा ‘सैनिक’ हा सिनेमा तुम्हाला आठवतो? या चित्रपटात अक्षयने एका सैनिकाची भूमिका साकारली होती. अश्विनी भावे, रोनित रॉय, अनुपम खेर असे अनेक दिग्गज या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटातील एक हिरोईन तुम्हाला कदाचित आठवत असेल. या हिरोईनने चित्रपटात अक्षयच्या बहिणीची भूमिका साकारली होती. होय, या अभिनेत्रीचे नाव होत फरहीन. हीच फरहीन  नंतर ‘नजर के सामने’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. फरहीन अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेषत: तिच्या चेह-यानेही लोकांना आकर्षित केले. याचे कारण म्हणजे, फरहीनचा चेहरा माधुरी दीक्षितशी बराच मिळताजुळता होता.

फरहीनने 1992 मध्ये प्रदर्शित ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यानंतर सैनिक, नजर के सामने, फौज, दिल की बाजी, आग का तुफान अशा अनेक चित्रपटांत काम केले. हिंदी सिनेमात लोकप्रिय झाल्याने फरहीनला साऊथच्याही ऑफर आल्या. साऊथच्या अनेक चित्रपटांतही तिने काम केले. मात्र यानंतर फरहीन अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.

चित्रपटसृष्टीला रामराम ठोकणा-या फरहीनने माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत लग्न केले. लग्नाआधी चार वर्षे दोघांचे अफेअर होते. लग्नानंतर फरहीनने पुन्हा चित्रपटसृष्टीत परण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या कमबॅक सिनेमाचे काय झाले, हे कळले नाही.

सध्या फरहीन एक यशस्वी बिझनेसवूमन म्हणून ओळखली जाते. ग्लॅमरची दुनिया सोडल्याचा तिला जराही पश्चाताप नाही. तिचा हर्बल स्किन केअर प्रॉडक्ट्सचा बिझनेस आहे. नेचुरेंस हर्बल्स नामक कंपनीची ती डायरेक्टर आहे. गत 18 वर्षांपासून ती हा बिझनेस सांभाळतेय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This duplicate of Madhuri Dixit actress farheen married cricketer manoj prabhakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.