Dostana 2 movie karan johar unfollow kartik aaryan on instagram | OMG ! दोस्ताना तुटल्यानंतर करण जोहरने कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर केलं अनफॉलो

OMG ! दोस्ताना तुटल्यानंतर करण जोहरने कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर केलं अनफॉलो

करण जोहरचा सिनेमा 'दोस्ताना 2' सध्या खूप चर्चेत आहे. करणने कार्तिक आर्यनला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासाठी धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केले आहे. ज्यामध्ये असे लिहिले होते की काही कारणांमुळे दोस्ताना 2 पुन्हा कास्ट होत आहे. ऐवढेच नाही तर करण जोहरनेकार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं आहे. 

रिपोर्टनुसार करणने हे करण्यामागील कारण म्हणजे कार्तिक आर्यनचे अनप्रोफेशनल वागणं. असं म्हणतात की, कार्तिकने चित्रपटाच्या अनेक सीन्स शूटिंगनंतर सुमारे 20 दिवस शूटिंग पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर अचानक कार्तिकला चित्रपटाचा दुसरा भाग आवडला नाही.त्याने सिनेमात बदल करण्याची मागणी केली पण करणने हे अजिबात मान्य नव्हते. करणने कार्तिकला चित्रपटातून काढून टाकलं.आता करणने कार्तिकला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे, पण कार्तिकने अद्याप तसे केले नाही.

बॉलिवूडमध्ये कलाकारांना चित्रपटातून काढून टाकण्याची गोष्ट काही नवी नाही . या प्रकरणावर अद्याप कार्तिकचे कोणतेही स्टेटमेंट समोर आले नाही तर दुसरीकडे सोशल मीडियावर कार्तिकच्या चाहत्यांनी करण जोहरच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. प्रत्येकाचे म्हणणे आहे की हे कार्तिकसारख्या अभिनेत्याबरोबर असे होऊ नये आणि आम्ही त्याला दुसरा सुशांत सिंग राजपूत होऊ देणार नाही. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dostana 2 movie karan johar unfollow kartik aaryan on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.