उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. त्यानंतर विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केलं. तसंच त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

विकी कौशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो व त्याच्या आगामी प्रोजेक्टचे अपडेट देत असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ओळखता येत नाही. कारण हा फोटो त्याच्या बालपणीचा आहे. या फोटोत तो फ्रिजमध्ये बसलेला पहायला मिळतो आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन दिलंय की, फ्रिज पोटॅटो. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रेटीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

'रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत.

विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

विकी सध्या त्याच्या उधम सिंग या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दिग्दर्शक शूरजित सरकारच्या सरदार उधम सिंगमध्ये त्याची भूमिका खूपच वेगळी आहे.

सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला सरदार उधम सिंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


Web Title: Do you know this little girl sitting in the fridge?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.