बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झाने नुकतीच गुड न्यूज दिली आहे. तिने प्रेग्नेंट असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. नुकतीच तिने एक्सरसाइज आणि योग करतानाचा क्लिप सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या क्लिपमध्ये दीया एका प्रोफेशनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली एक्सरसाइज, माइल्ड वेट ट्रेनिंग आणि योगा करताना दिसते आहे. दीयाने अभिनेता वैभव रेखीसोबत फेब्रुवारीत लग्नबेडीत अडकली. तेव्हापासून ती चर्चेत येते आहे. या महिन्याच्या सुरूवातीला दीयाने प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली होती की ती आणि वैभव त्यांच्या पहिल्या बाळाचे पालक बनणार आहे.


दरम्यान दीया मिर्झाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक्सरसाइज आणि योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  या क्लिपमध्ये दीया एका प्रोफेशनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली एक्सरसाइज, माइल्ड वेट ट्रेनिंग आणि योगा करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


दीया मिर्झाने प्रेग्नेंट असल्याचे सांगितल्यावर एका इंस्टाग्राम युजरने तिला विचारले की, लग्नाच्या आधी ही न्यूज का शेअर केली नाही. युजरने लिहिले की, हे खूप चांगले आहे. पण समस्या ही आहे की तिने महिलेशी निगडीत रुढी तोडण्याचा प्रयत्न केला. तर लग्नाच्या आधी प्रेग्नेंसीबद्दल का सांगू शकली नाही? का लग्नानंतर प्रेग्नेंट होणे स्टिरिओटाइप नाही आहे, जे आपण फॉलो करतो ?, लग्नाच्या आधी महिला प्रेग्नेंट का राहू शकत नाही?


त्यावर उत्तर देत दीयाने लिहिले की, इंस्टरेस्टिंग प्रश्न. सर्वात आधी, आम्ही लग्न यासाठी केले नाही की आम्ही बाळाला जन्म देणार आहोत. आम्ही लग्न यासाठी केले कारम आम्हाला एकत्र जीवन व्यतित करायचे होते. आम्ही जेव्हा लग्नाचा प्लान करत होतो तेव्हा आम्हाला बाळाबद्दल समजले. त्यामुळे हे लग्न प्रेग्नेंसीमुळे केलेले नाही.


दीयाने पुढे म्हटले की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. मी बरीच वर्षे या क्षणाची वाट पाहात होती. मी फक्त वैद्यकीयदृष्ट्या सर्व काही सुरळीत होण्याची वाट पाहत होती. दीया पुढे म्हणाली की मुलाला जन्म देणे ही सर्वात सुंदर भावना आहे आणि मला हा प्रवास अधिक सुंदर बनवाचा आहे त्यात कोणत्याही प्रकारची लाज बाळगण्याचे असे कारण नाही.


दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. त्यांच्यातील मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Diya Mirza appeared in pregnancy while exercising and doing yoga, the video came in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.