Disha Patani is impressed with tiger shroff music video and this is what she has to say on it | टायगर श्रॉफच्या म्युझिक व्हिडीओने इम्प्रेस झाली दिशा पटनी, म्हणाली...

टायगर श्रॉफच्या म्युझिक व्हिडीओने इम्प्रेस झाली दिशा पटनी, म्हणाली...

दिशा पटनीने टायगर श्रॉफचा नवा म्युझिक व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि तिने या व्हिडीओचं कौतुकही केलंय. काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफचा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला होता. ज्याचं टायटल 'अनबिलिवेबल' असं होतं. दिशाने हा व्हिडीओ शेअर केला आणि हार्टचा इमोजी बनवत हा व्हिडीओ शानदार असल्याचं सांगितलं. टायगरचा हा व्हिडीओ मंगळवारी रिलीज करण्यात आला होता आणि लगेच व्हायरलही झाला होता. या व्हिडीओसोबत टायगरने गायनात डेब्यू केलंय.

टायगर आणि दिशा सप्टेंबरच्या मध्यात रविवारी एकत्र दिसले होते. दोघे याआधीही अनेकदा एकमेकांसोबत दिले आहेत. पण दोघांनी कधीही ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीरपणे मान्य केले नाही. टायगरला ऑगस्ट २०१९ मध्ये एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तू दिशाला डेट करतोय का? यावर टायगर म्हणाला होता की, त्याची दिशाला डेट करण्याची लायकी नाही. तेच दिशाने भारत सिनेमाच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, ती टायगरला नेहमीच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. आणि अनेक वर्षांपासून ती टायगर श्रॉफला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण काहीही फायदा होताना दिसत नाहीये.

दोघांच्याही कामाबाबत सांगायचं तर टायगर नुकताच 'बागी ३' मध्ये दिसला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार चांगलं प्रदर्शन केलं नव्हतं. पण त्याआधी आलेल्या टायगरच्या 'वॉर' सिनेमाने रग्गड कमाई केली होती. या सिनेमात पहिल्यांदाच टायगर, हृतिक रोशन आणि वाणी कपूर एकत्र दिसले होते. तर दिशाने सलमान खानसोबत 'भारत' सिनेमात काम केलं होतं. आता ती सलमानसोबत 'राधे' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा दबंग ३ आणि वॉन्टेडचा दिग्दर्शक प्रभु देवा दिग्दर्शित करणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Disha Patani is impressed with tiger shroff music video and this is what she has to say on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.