Direction Patani and Aditya Roy Kapur will be seen together in this film | दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर झळकणार एकत्र ह्या सिनेमात

दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर झळकणार एकत्र ह्या सिनेमात

अभिनेत्री दिशा पटानीने बागी २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटातील भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आता दिशा लवकरच एका चित्रपटात झळकणार असून या सिनेमात तिच्यासोबत दिसणार आहे आशिकी २ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. 

दिशा व आदित्य यांच्या चित्रपटाबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटर अकाउंटवर दिली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या टीमचा फोटो शेअर करीत अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव मलंग असे आहे. 



 

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या चित्रपटामध्ये दिशा आणि आदित्य स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तरण आदर्शप्रमाणेच दिशानेदेखील हा फोटो शेअर केला आहे.

भूषण कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य आणि दिशा यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Direction Patani and Aditya Roy Kapur will be seen together in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.