रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:52 PM2021-08-16T19:52:35+5:302021-08-16T19:53:18+5:30

अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच शेअर केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

Did you see the petrol bill shared by Richa Chadha ?, Photo goes viral on social media | रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

रिचा चड्ढाने शेअर केलेलं पेट्रोलचं बील पाहिलंत का?, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

Next

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्याचा फटका अनेकांना बसला. त्यात देशातील इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. दरम्यान अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच शेअर केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

अभिनेत्री रिचा चड्ढाने नुकतेच तिच्या पेट्रोल गाडीची टाकी फूल केली आणि तिला ७८५५ रुपये भरावे लागले. बिलाचा फोटो शेअर करत तिने ट्विट केले की, ‘मी गाडीत नुकतेच पेट्रोल भरले. गाडीची टाकी फूल करण्यासाठी मला ७८५५ रुपये मोजावे लागले.’ तिच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. 


देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा भाव १०१.८४ रुपये आहे. तर डिझेलचा भाव ८९.८७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपये आणि डिझेलचा भाव ९७.४५ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव १०२.०८ रुपये आणि डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ आणि डिझेलचा भाव प्रति लिटर ९४.३९ रुपये आहे. 


रिचा चड्ढाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती मॅडम चीफ मिनिस्टरमध्ये पहायला मिळाली होती. बऱ्याच काळापासून ती फुकरे ३मुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा भोळी पंजाबीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Did you see the petrol bill shared by Richa Chadha ?, Photo goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app